agriculture news in marathi, Eight dams will be checked in Ratnagiri | Agrowon

रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

रत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणतेही धरण धोकदायक नसल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने दिला आहे. परंतु, काही प्रमाणात गळती असलेल्या आठ धरणांची नाशिक येथील धरण सुरक्षितता संघटनेतर्फे तपासणी करण्यात येईल’’, अशी माहिती कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी दिली.

रत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणतेही धरण धोकदायक नसल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने दिला आहे. परंतु, काही प्रमाणात गळती असलेल्या आठ धरणांची नाशिक येथील धरण सुरक्षितता संघटनेतर्फे तपासणी करण्यात येईल’’, अशी माहिती कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी दिली.

तिवरे धरण फुटल्यामुळे २२ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी करण्याचे आदेश शासनाने पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार पूर्ण झालेल्या सर्व धरणांच्या पुनःश्‍च तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. तपासणी करण्यासाठी सुधारित तपासणी सूची देण्यात आली होती. यामध्ये माती धरणाच्या भरावामधून गळती होते का? भराव खचत आहे का?, सांडवा, दगडी धरणात गळती, माती भराव सांडव्याच्या जोडातील गळती, फाउंडेशन गलरी, विमोचन बांधकामातून गळती, विमोचकाभोवतीचा माती भराव सुस्थितीत आहे का?, विद्युतपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा आहे का? आदींची पाहणी करण्यात आली. 

तपासणी मोहिमेत कोणतेही धरण धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु, आठ धरणांमध्ये पाण्याचा पाझर होत असल्याने या धरणांची तपासणी करण्याचे पत्र रत्नागिरी पाटबंधारे विभागाने धरण सुरक्षितता संघटनेला दिले. या आठ धरणांमध्ये निवे, कोंडीवली, मोरवणे, तेलेवाडी, खेम, साखरपा, तणवडे, टांगर या धरणांचा समावेश आहे. या धरणांच्या ठिकाणी दोन कर्मचारी कायमस्वरूपी पाहणी करण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. खेम धरणावर केमिकल ग्राउटिंग करण्यात येणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या एका पथकाने पाहणी केली असल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले.


इतर बातम्या
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व...नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...