Agriculture News in Marathi To eight factories Lifting license in Sangli | Page 4 ||| Agrowon

आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

सांगली जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला होता. यंदाही १५ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज दाखल केला असून, त्यापैकी आठ कारखान्यांना आजअखेर परवाना मिळाला आहे; तर सात कारखान्यांचे परवाने विविध कारणामुळे प्रलंबित आहेत. 

सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला होता. यंदाही १५ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज दाखल केला असून, त्यापैकी आठ कारखान्यांना आजअखेर परवाना मिळाला आहे; तर सात कारखान्यांचे परवाने विविध कारणामुळे प्रलंबित आहेत. यंदा महापुराचा फटका बसल्यामुळे काही क्षेत्र कमी झाले असल्याने १५ ते २० टक्के घट होण्याची शक्यता आहे. 

गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते. परवाना घेण्यासाठी १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. तसेच गाळप परवाना न घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम दिलेल्या कारखान्यांनाच गाळप परवाना देण्याचे धोरण साखर आयुक्तालयाने घेतले आहे. जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला होता. यंदाच्या हंगामातही १५ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे अर्ज दाखल केले आहेत.

प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडून या १५ साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी आठ कारखान्यांना आजअखेर परवाना मिळाला आहे. त्यामध्ये दत्त इंडिया, राजारामबापू कारखाना, सोनहिरा, निनाईदेवी, क्रांती, उदगिरी शुगर, सद्‌गुरू श्री श्री मोहनराव शिंदे या कारखान्यांचा समावेश आहे; तर यशवंत, राजारामबापू युनिट एक ते तीन, तासगाव कारखाना, विश्‍वास आणि हुतात्मा या सात कारखान्यांचा परवाना आजच्या तारखेला प्रलंबित होता. 

परवाने प्रलंबित राहण्यामागे थकीत एफआरपीसह इतर गोष्टी कारणीभूत आहेत. परवान्याशिवाय गाळप करता येत नाही. मात्र लवकरच या कारखान्यांना परवाने मिळतील. कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यास परवानगी मिळाली असली तरी दोन आठवड्यांनी दिवाळी आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी काही आणि दिवाळीनंतर काही कारखान्यांचा हंगाम सुरू होईल अशी परिस्थिती आहे. 

जिल्ह्यातील ऊसक्षेत्र 
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात १ लाख २२ हजार ८६९ हेक्टर इतके ऊस क्षेत्र आहे. महापुराचा फटका बसल्यामुळे काही क्षेत्र कमी झाले आहे. १५ ते २० टक्के घट होण्याची शक्यता आहे. 

गतवर्षीचे चित्र 
जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांनी ८० लाख टन उसाचे गाळप करून ९५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदा गाळप आणि साखर उत्पादनात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. 
 

प्रतिक्रिया 
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एकरकमी एफआरपी देतात. सांगलीत मात्र ठरावीक कारखानेच देतात. सध्या साखरेचे दर चांगले आहेत. त्यामुळे एकरकमी एफआरपी देण्यात कोणतीही अडचण येणार नाही. 
- सुनील फराटे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष


इतर बातम्या
द्राक्ष बागाईतदार संघाने मांडल्या...नाशिक : द्राक्ष निर्यातीबाबत या हंगामात...
रायगड जिल्ह्यातील १७९ ग्रामपंचायतीमध्ये...अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त...
पुणे विभागात रब्बीच्या पेरण्यांना येईना...पुणे : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार होत...
‘आत्मा’ शेतकरी सल्लागार समित्यांना...नगर ः कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसह ‘...
अनियमित वीजपुरवठ्याने नांदेड जिल्ह्यात...नांदेड : खरिपाचा हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा...
खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच  जळगाव ः  खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
ऑक्टोबरमध्ये बाजारात आला ३१.१३ लाख गाठी...पुणे ः कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर...
जळगाव बँकेच्या अध्यक्षपदासाठी  देवकर,...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी...
केव्हीकेतर्फे कीडनियंत्रण सापळ्यांचे...वाशीम : अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे जसे...
कृषिपंपांसाठी ‘प्रहार’ करणार आंदोलनभंडारा ः आधारभूत खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या...
नाशिक: बच्चू कडू यांच्याकडून जलसंपदा...नाशिक: राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम सन...
देवीखिंडीच्या शेतकऱ्यांना ‘टेंभू’च्या...लेंगरे, जि. सांगली : टेंभूच्या चौथ्या, पाचव्या...
शेततळ्यांना मिळणार ५२ कोटींचे अनुदानपुणे ः राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या...
राज्यात पावसाची उघडीप शक्य पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली...
 हवामानाच्या अचूक अंदाजासाठी ...औरंगाबाद : येथे सी बँड रडार डॉपलर बसविण्यास...
ब्राझीलमध्ये सोयाबीनची ८६ टक्के पेरणी...पुणे ः यंदा पेरणीला पोषक वातावरण असल्याने...
लाटलेला पैसा वसूल करण्याचे आदेशपुणे ः गट शेतीबाबत राज्य शासनाला दिशाभूल करणारी...
सांगली जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे...
जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास...सातारा, सांगली, जळगाव आणि धुळे-नंदूबार जिल्हा...