agriculture news in Marathi eight fertilisers rec unloaded Maharashtra | Agrowon

खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात अडकून पडलेल्या खतांच्या आठ रेल्वे रेक कृषी विभागाच्या हस्तक्षेपानंतर ‘अनलोड’ झाल्या आहेत. 

पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात अडकून पडलेल्या खतांच्या आठ रेल्वे रेक कृषी विभागाच्या हस्तक्षेपानंतर ‘अनलोड’ झाल्या आहेत. 

खताची रेल्वे रेक विविध रेकपॉईंटला आल्यानंतर दहा तासात खाली म्हणजेच ‘अनलोड’ करावी लागते. यात स्थानिक व परप्रांतिय मजूर, मालवाहतूकदार यांचा सहभाग महत्वाचा असतो. तथापि, लॉकडाऊननंतर ‘अनलोडिंग’ला मनुष्यबळ नव्हते. राज्यात आठ रेक विविध ठिकाणी ‘अनलोडिंग’साठी उभे होते. 

‘‘कृषी विभागाचे अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्या सांगितल्या. त्यानंतर आठही रेक ‘अनलोड’ करून खते पुढे गोदामांमध्ये तसेच विक्रेत्यांकडे पोहोचली आहेत. मात्र, वर्ध्यात एक रेक अजूनही अडकून पडली आहे. ती ‘अनलोड’ करण्यासाठी युध्दपातळीवर पाठपुरावा सुरू आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, राज्यात खते व कीटकनाशके उत्पादनाशी संबंधित वाहतुकीसाठी मान्यता द्यावी, अशा सूचना सर्व जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या खते व रसायने मंत्रालयाने २३ मार्च रोजी आणि गृह विभागाने २५ मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकांचा संदर्भ घेत कृषी विभागाने या सूचना काढल्या आहेत. 

कोरोना संसर्ग नियंत्रण नियमावलीची काळजी घेत खते आणि कीटकनाशके उत्पादन तसेच वाहतुकीसाठी अत्यावश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया सुरूच ठेवाव्यात, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. खते उत्पादक कंपन्यांनी रेल्वेशी समन्वय ठेवून खतांची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी काळजी घ्यावी. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत खते मिळू शकतील, अशी जाणीव कंपन्यांना देखील करून देण्यात आली आहे. 

‘‘स्थानिक मागणीनुसार खते व कीटकनाशकांची वाहतूक करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या प्रक्रियेत गुंतलेले हमाल, ट्रकचालक, मजूर यांना योग्य ती काळजी घेत कामे पुर्ण करावी. तसेच विक्रेत्यांनी देखील कामे सुरू ठेवावीत,’’ असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या...औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद...
शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची...अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक)...
पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची...माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...