नाशिक जिल्ह्यात आठ गोदाम बांधकामास मान्यता

नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकासनिधी अंतर्गतजिल्ह्यातील निफाड, येवला, मालेगाव, नांदगाव व नाशिक तालुक्यांत आठ शासकीय गोदामांच्या बांधकाम अंदाजपत्रकांनामान्यता दिली.
नाशिक जिल्ह्यात आठ शासकीय गोदामांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता Eight government in Nashik district Administrative approval for construction of warehouses
नाशिक जिल्ह्यात आठ शासकीय गोदामांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता Eight government in Nashik district Administrative approval for construction of warehouses

नाशिक : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकासनिधी अंतर्गत जिल्ह्यातील निफाड, येवला, मालेगाव, नांदगाव व नाशिक तालुक्यांत आठ शासकीय गोदामांच्या बांधकाम अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा व पालकमंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.       

जिल्ह्यात अन्न, धान्याची अधिक साठवणूक करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी आठ नवीन गोदाम बांधकामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबतच १५ डिसेंबर २०२० रोजी पत्रान्वये विनंती केली होती. त्यानुसार त्यास मान्यता दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यामध्ये अन्न, धान्याची साठवणूक करण्यासाठी अधिक आठ गोदामे मंजूर झाल्याने अन्न, धान्य साठविण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाद्वारे खरेदी केलेले अन्न धान्य साठवणूक करण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर रेशन व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अन्न, धान्याचा साठा निर्माण होऊन अन्न, धान्याची टंचाई देखील त्यामुळे निर्माण होणार नाही.

अशी आहे गोदामांना मान्यता    

  • ठिकाण    गोदाम संख्या
  • पिंपळगाव बसवंत ता.निफाड    १
  • नांदगाव,ता.नांदगाव    १
  • अंगणगाव ता.येवला    १
  • राजूरबाहूला,ता.नाशिक    ३ 
  • मौजे चंदनपुरी ता.मालेगाव    २
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com