कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा : राऊत
राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी (ता. २४) मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले.
मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी (ता. २४) मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले. अन्य राज्याच्या तुलनेने औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे.
राज्यातील उद्योगांचे वीजदर कमी करणे गरजेचे आहे. त्यामुळे वीजदर किमान एक रुपया प्रति युनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सोबतच घरगुती व वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करावे, असेही निर्देश डॉ. राऊत यांनी दिले.
राऊत म्हणाले, ‘‘नवीन कृषीपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि कृषिपंप वीज वाहिन्या अतिभारीत (ओव्हरलोड) होत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे व रोहित्रांची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम त्वरित करा.
राज्यातील किती ठिकाणी आणि कोणते रोहित्र दिवसा आठ तास वीज देण्यास सक्षम नाही, हे शोधून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करा. नवीन अपारंपरिक ऊर्जा धोरणांमुळे स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे.
राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून, भविष्यात विजेची मागणी वाढणार असल्याने स्वस्त विजेची खरेदी करण्यासाठी आराखडा तयार करा.’’ बैठकीस महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- 1 of 1098
- ››