राज्यात वर्षभरात ८ लाखांवर वीजजोडण्या : सिंघल

कोल्हापूर : महवितरणकडून गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील राज्यात तब्बल ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत : महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल
राज्यात वर्षभरात ८ लाखांवर वीजजोडण्या : सिंघल
राज्यात वर्षभरात ८ लाखांवर वीजजोडण्या : सिंघल

कोल्हापूर : महवितरणकडून गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील राज्यात तब्बल ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आवश्यक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित वीजजोडण्या तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी दिले आहेत. महावितरणच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी मागणीनुसार साधारणतः ९ ते १० लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाउन असल्याने नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. तरीही इतर वीजसेवांप्रमाणेच नवीन वीजजोडणी देण्याच्या कामात खंड पडला नाही. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कोकण प्रादेशिक विभागामध्ये २ लाख ८५ हजार ३३२, तर पुणे प्रादेशिक विभाग २ लाख २८ हजार ६९३, नागपूर प्रादेशिक विभाग १ लाख ६५ हजार १८१ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागामध्ये १ लाख २३ हजार ५७१ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा कमी करण्यासाठी महावितरणकडून सिंगल फेजचे १८ लाख व थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादारांना देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे महावितरणच्या चारही प्रादेशिक कार्यालयांना मार्चअखेरपर्यंत ३ लाख ३५ हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. 

या महिन्यात साडेतीन लाख मीटर देणार एप्रिल महिन्यात देखील सुमारे साडेतीन लाखांवर नवीन वीजमीटर पुरविण्याचे नियोजन आहे. उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर वर्गवारीतील ६ लाख २७ हजार ५२९ वीजग्राहकांना एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत तर १ लाख ८२ हजार ५४१ नवीन वीजजोडण्या जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीत कार्यान्वित करण्यात आल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com