agriculture news in marathi, eight lakhs farmers include in shetkari sanman scheme, ratnagiri, maharashtra | Agrowon

शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ लाख नवे शेतकरी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टरची अट सरकारने रद्द केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थी संख्येत भर पडणार असून सुमारे ७ लाख ९५१ शेतकऱ्यांच्या नोंदी नव्याने होतील असा अंदाज आहे. या सर्व लाभार्थ्यांची नोंदणी ३० जूनपूर्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टरची अट सरकारने रद्द केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थी संख्येत भर पडणार असून सुमारे ७ लाख ९५१ शेतकऱ्यांच्या नोंदी नव्याने होतील असा अंदाज आहे. या सर्व लाभार्थ्यांची नोंदणी ३० जूनपूर्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हाधिकारी रोहयो सुशांत बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप आदी उपस्थित होते. नव्या निर्णयानंतर पात्र लाभार्थी आणि अपात्र लाभार्थी यांचे निकष नव्याने जारी केले आहेत. महसूलकडील नोंदीनुसार जिल्ह्यातील एकूण ८ अ प्रमाणपत्रांची संख्या ८ लाख ७ हजार १६८ आहे. क्षेत्रमर्यादा हटविल्याने शेतकऱ्‍यांच्या नोंदी नव्याने होणार आहेत.

पात्र लाभार्थ्यांची नावे, खाते क्रमांक, आधार वापर आणि आयएफसीआय कोडसह बँकेतील खाते क्रमांक यांची नोंदणी ३० जूनपूर्वी आवश्यक आहे. लाभार्थ्यांची माहिती परिशिष्ट अ (२१ रकाने) ते परिशिष्ट ड पर्यंत घेऊन त्याची डाटा एन्ट्री करायची आहे. कमी कालावधी आणि मनुष्यबळाची कमतरता या पार्श्वभूमीवर सर्व संबधितांनी यास प्राधान्य द्यावे आणि  शासनाच्या धोरणानुसार थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात मिळण्याच्या दृष्टिकोनातून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

इतर ताज्या घडामोडी
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....