Agriculture news in Marathi, Eight thousand farmers in Ratnagiri district wait for crop loan | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार ९९३ शेतकऱ्यांना ८२ कोटी ९२ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर, अद्यापही ८ हजार २०१ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. 

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ हजार ९९३ शेतकऱ्यांना ८२ कोटी ९२ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर, अद्यापही ८ हजार २०१ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. 

खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. त्यांना नव्याने कर्जही उपलब्ध होत नव्हते. त्यांच्यासाठी राज्य शासनाने २०१७ मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर केली. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यत कर्जमाफी, दीड लाखावरील शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. 

दीड लाखांपर्यत कर्ज माफी व दीड लाखावरील शेतकऱ्यांना एकवेळ तडजोड योजना लागू केली होती. या योजनेतंर्गत जिल्हा बँकेचे १०९ शेतकऱ्यांचे एक कोटी रुपयांचे कर्जमाफ झाले. व्यापारी बँकेच्या १८२ शेतकऱ्यांना १ कोटी ६५ लाख ५९ हजार तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या ५८० शेतकऱ्यांना ५ कोटी ८७ लाख तसेच व्यापारी बँकेच्या १८२ शेतकऱ्यांना एक कोटी ६५ लाख ५९ हजारांची कर्जमाफी मिळाली. 

जिल्ह्यातील एकूण ८७१ शेतकऱ्यांना एकवेळ समजोता योजनेतंर्गत ८ कोटी ५२ लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. २०१५ ते २०१७ वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली. त्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या २१ हजार २७० शेतकऱ्यांना २१ कोटी ३० लाखांचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला. शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ३८ हजार ९९३ शेतकऱ्यांना ८२ कोटी ९२ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. जिल्हा व राष्ट्रीयीकृत बँकांच्या ज्या कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

इतर बातम्या
राज्य बॅंक प्रकरणात मोहिते पाटील, सोपलसोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
विश्वी येथे शेतीशाळेत मिळताहेत...बुलडाणा ः मेहकर तालुक्यातील विश्वी येथे शेतीशाळा...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनवर काळ्या...हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील केलसुलासह (ता....
राष्ट्रीय जलधोरणात शेतकऱ्यांना...भंडारा ः ‘नदी जोड प्रकल्पाला प्राधान्य...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
खानदेशात कांदा लागवड सुरूजळगाव  ः खानदेशात लाल कांद्याची लागवड सुरू...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
सोलापूर येथे शेतकरी मानधन योजनेच्या...सोलापूर : पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेतील नोंदणीस...
रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेत प्रवेश नाशिक : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुळीथ, वालाचे...रत्नागिरी : या वर्षी पडलेल्या मुसळधार...
मराठवाड्यातील मध्यम, लघुप्रकल्पांत २९...औरंगाबाद : अर्धेअधिक पावसाळा लोटल्यानंतरही...