Agriculture news in Marathi Eight thousand rupees per quintal of onion in the Nagar | Agrowon

नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम आहे. रविवारी (ता. १८) पारनरे बाजार समितीत एक नंबर कांद्याला ८००० रूपये तर आज सोमवारी (ता. १९) नगर बाजार समितीत सरासरी ७००० ते ९१०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळाला. कांदा दरात वाढ झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांत उत्साह आहे.

नगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम आहे. रविवारी (ता. १८) पारनरे बाजार समितीत एक नंबर कांद्याला ८००० रूपये तर आज सोमवारी (ता. १९) नगर बाजार समितीत सरासरी ७००० ते ९१०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळाला. कांदा दरात वाढ झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांत उत्साह आहे.

नगर जिल्ह्यात कांदा उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे. मध्यंतरी कांद्याला दर नव्हता. त्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांना दराची चिंता लागली होती. मात्र, यंदा पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांकडेही फारसा कांदा उपलब्ध नसल्याने व मागणी चांगली असल्याने कांद्यांच्या दरात वाढ होत आहे. रविवारी पारनेरला लिलावात प्रथम क्रमांकाच्या कांद्याला ९० रुपये, तर इतर कांदा ६५ ते ८० रुपये व त्या खालोखाल ५५ ते ६५ रुपये किलो दर मिळाला. यंदाच्या हंगामातील हा येथील उच्चांकी भाव आहे.

सततच्या पावसाने कांदापिकाचे मोठे नुकसान झाल्याने आता ठराविक शेतकऱ्यांकडेच कांदा शिल्लक आहे. कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने, ज्यांच्याकडे कांदा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.

बाजार समितीत ९७३५ कांदा गोण्यांची आवक झाली. वाघुंडे येथील शिवाजी दिवटे यांच्या प्रथम क्रमांकाच्या कांद्याला ९० रुपये किलो भाव मिळाला. या हंगामातील हा उच्चांकी भाव आहे. तसेच, आता शेतकऱ्यांकडेच माल शिल्लक न राहिल्याने कांद्याचे बाजार आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. नगरलाही पन्नास हजारापेक्षा अधिक गोण्याची आवक झाली.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...