दंड न भरणाऱ्या आठ वाहनांचा ३१ मार्चनंतर लिलाव

शहादा, जि. नंदुरबार : ‘‘वर्षभरात तालुक्यात परवानगी नसताना बेकायदेशीर गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या विविध ३४ वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली आहे.
Eight who do not pay the fine Vehicles auctioned after March 31
Eight who do not pay the fine Vehicles auctioned after March 31

शहादा, जि. नंदुरबार : ‘‘वर्षभरात तालुक्यात परवानगी नसताना बेकायदेशीर गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या विविध ३४ वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. ३८ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. यापैकी २५ लाख ७५ हजार ३७५ रुपयांची रक्कम वसूल केली आहे. उर्वरितांना दंड भरण्याबाबत नोटिसाही बजावल्या आहेत. अद्याप दंडाची रक्कम न भरलेल्या वाहनांचा लिलाव करून दंड वसूल केला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. 

तालुक्यातील गोमाई व इतर नदीतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जाते. वेळोवेळी महसूल विभागातर्फे त्या वाहनांवर कारवाई करून त्यांना आर्थिक दंड भरण्याबाबत नोटिसा बजावल्या जातात. काही महिन्यांत महसूल विभागाने वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. ही वाहने तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यात जप्त करून ठेवली आहेत. दंडाची रक्कम भरण्याबाबत नोटिसा बजावल्यानंतरही अद्याप आठ वाहनचालक व मालकांनी सुमारे नऊ लाख ४९ हजार ५०० रुपये दंडाची रक्कम भरलेली नाही, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. 

वर्षभरात महसूल विभागातर्फे अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी पथके स्थापन करून कारवाई करण्यात आली. त्यात तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथे ८७३ ब्रास वाळूसाठा जप्त करून त्याचा लिलाव करण्यात आला. त्यातून १७ लाख ६६ हजार ९५२ रुपयांचा महसूल मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com