पुण्यात पावसाचा आठ वर्षांतील उच्चांक; ८७.३ मिलीमिटरची नोंद

पुण्यात पावसाचा आठ वर्षांतील उच्चांक; ८७.३ मिलीमिटरची नोंद
पुण्यात पावसाचा आठ वर्षांतील उच्चांक; ८७.३ मिलीमिटरची नोंद

पुणे : शहरात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात ९४ मिलिमीटर पावसाची नोंद २०११ मध्ये झाली होती. आठ वर्षांनंतर एका रात्रीत ८७.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची घटना पुण्यात घडली. मंगळवारी (ता. २४) सकाळी साडेआठ ते बुधवारी (ता. २५) सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये हा पाऊस कोसळला. पुण्यात या वर्षी १ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरदरम्यान ३२६.४ मिलिमीटर पाऊस पडला. त्यापैकी १४३.२ मिलिमीटर पाऊस अवघ्या ४८ तासांमध्ये पडला. यापूर्वी दहा वर्षांत इतक्‍या कमी वेळेत एवढा पाऊस पडल्याची हवामान खात्यात नोंद झालेली नाही. सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत काळे ढग आकाशात दाटून येतात. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ते गडद काळ्या रंगांचे होऊन विजांचा कडकडाट होऊ लागतो आणि जोरदार पावसाला सुरवात होते, असे चित्र दोन दिवस पुण्यात दिसत आहे, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. का कोसळला भयंकर पाऊस? 

  • अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्प येत आहे. 
  • पुण्यात हवेतील आद्रतेचे प्रमाण ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे.
  • सकाळी आणि संध्याकाळी आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपर्यंत किमान तापमानाचा पारा ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. दिवसभर आकाश ढगाळ असले तरीही उन्हाचा चटका जाणवत होता. यापूर्वी काही दिवस २७ ते २८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले जात होते. त्यामुळे कमाल तापमान तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढले होते. त्याच वेळी हवेतील आद्रतेचे वाढलेले प्रमाण यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले. तसेच, स्थानिक वातावरणाच्या बदलांमुळे हा पाऊस पडला.  - डॉ. अनुपम कश्‍यपी, हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग. पुण्यात सप्टेंबरमध्ये पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)  वर्ष ................. पडलेला पाऊस  २००९ ............१५७.६  २०१० ............ २०९.४  २०११ ............ ४०५.४  २०१२ ............ ९४.४  २०१३ ............ ४४४.२  २०१४ ............ ३४०  २०१५ ............ ३४७  २०१६ ............ १०७.४  २०१७ ............ २९८.८  २०१८ ............ ६२  २०१९ ............ ३२६.४ असा पडला पाऊस  शिवाजीनगर ......... ८७.३  लोहगाव ............. ५२.८  पाषाण ................. ७१.८  चिंचवड ............... ७१७.१  वडगावशेरी ........... ४३४.३  तळेगाव ................ १८१.८  (स्रोत ः भारतीय हवामान खाते. सर्व आकडे मिलिमीटरमध्ये.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com