भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
हमीभावाने १८ टक्के अधिक धान्य खरेदी : केंद्र सरकार
केंद्र सरकारने नोव्हेंबरअखेर खरीप हंगामातील ३१८ लाख टन धान खरेदी केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही खरेदी १८.५८ टक्के जास्त आहे, सरकारकडून बुधवारी (ता.२) ही माहिती देण्यात आली.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोव्हेंबरअखेर खरीप हंगामातील ३१८ लाख टन धान खरेदी केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही खरेदी १८.५८ टक्के जास्त आहे, सरकारकडून बुधवारी (ता.२) ही माहिती देण्यात आली.
कृषी मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, एकूण धान खरेदीत पंजाबचा वाटा सर्वाधिक ६३.७६ टक्के इतका म्हणजे २०२.७७ लाख टन इतका आहे. त्या खालोखाल हरियाना, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तमिळनाडू, चंडीगड, जम्मू आणि काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो. मागील वर्षी याच काळात २०२.७७ लाख टन खरेदी झाली होती, यंदा ती ३१८ लाख मेट्रिक टनांवर गेली आहे.
हमाभावाने ही खरेदी झाल्याने देशातील सुमारे २९.७० लाख शेतकऱ्यांना या खरेदीचा फायदा झाला आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ६० कोटी ३८ लाख ६८ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
मूग, सोयाबीनचीही खरेदी
केद्राच्या नोडल एजन्सींच्या माध्यमातून १ लाख ४ हजार ५४७ टन मूग, उडीद, शेंगदाणे आणि सोयाबीनची खरेदीही केली आहे, याची हमीभावाने ५६३.४३ कोटी रुपये किमत होते. या खरेदीचा फायदा ६० हजार १०७ शेतकऱ्यांना झाला आहे. शिवाय सरकारने ५२.४० कोटी रुपयांचे ५ हजार ८९ मेट्रिक टन सुके खोबरेही खरेदी केले आहे.
नोव्हेंबरअखेर २९ लाख ९ हजार कापूस गाठींची खरेदी
केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या २९ लाख ९ हजार २४२ कापूस गाठींची खरेदी केली आहे, त्याने हमीभावाने होणारे मूल्य ८ हजार ५१५.५३ कोटी रुपये इतके आहे. कापूस खरेदीचा फायदा ५ लाख ८१ हजार ४४९ शेतकऱ्यांना झाला आहे.
- 1 of 1059
- ››