agriculture news in marathi eighteen percent more procurement on MSP by Government this year : Center | Agrowon

हमीभावाने १८ टक्के अधिक धान्य खरेदी : केंद्र सरकार

वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

केंद्र सरकारने नोव्हेंबरअखेर खरीप हंगामातील ३१८ लाख टन धान खरेदी केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही खरेदी १८.५८ टक्के जास्त आहे, सरकारकडून बुधवारी (ता.२) ही माहिती देण्यात आली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोव्हेंबरअखेर खरीप हंगामातील ३१८ लाख टन धान खरेदी केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही खरेदी १८.५८ टक्के जास्त आहे, सरकारकडून बुधवारी (ता.२) ही माहिती देण्यात आली.

कृषी मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, एकूण धान खरेदीत पंजाबचा वाटा सर्वाधिक ६३.७६ टक्के इतका म्हणजे २०२.७७ लाख टन इतका आहे. त्या खालोखाल हरियाना, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तमिळनाडू, चंडीगड, जम्मू आणि काश्‍मीर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो. मागील वर्षी याच काळात २०२.७७ लाख टन खरेदी झाली होती, यंदा ती ३१८ लाख मेट्रिक टनांवर गेली आहे. 

हमाभावाने ही खरेदी झाल्याने देशातील सुमारे २९.७० लाख शेतकऱ्यांना या खरेदीचा फायदा झाला आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ६० कोटी ३८ लाख ६८ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 

मूग, सोयाबीनचीही खरेदी
 केद्राच्या नोडल एजन्सींच्या माध्यमातून १ लाख ४ हजार ५४७ टन मूग, उडीद, शेंगदाणे आणि सोयाबीनची खरेदीही केली आहे, याची हमीभावाने ५६३.४३ कोटी रुपये किमत होते. या खरेदीचा फायदा ६० हजार १०७ शेतकऱ्यांना झाला आहे. शिवाय सरकारने ५२.४० कोटी रुपयांचे ५ हजार ८९ मेट्रिक टन सुके खोबरेही खरेदी केले आहे.

नोव्हेंबरअखेर २९ लाख ९ हजार कापूस गाठींची खरेदी
केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या २९ लाख ९ हजार २४२ कापूस गाठींची खरेदी केली आहे, त्याने हमीभावाने होणारे मूल्य ८ हजार ५१५.५३ कोटी रुपये इतके आहे. कापूस खरेदीचा फायदा ५ लाख ८१ हजार ४४९ शेतकऱ्यांना झाला आहे.


इतर अॅग्रोमनी
जागतिक मका उत्पादनात घट वॉशिंग्टन ः जागतिक मका उत्पादनात घट होणार...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
दराचे संरक्षण देणाऱ्या योजना राबवाव्यात पुणे ः ‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’मधून शेतकरी...
‘बासमती’ची तांदळाचा तुटवडाकोल्हापूर: गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या...
सोयाबीन बाजारात तेजीचेच संकेतपुणे ः शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन...
तांदळाच्या विक्रमी निर्यातीची यंदा शक्‍...कोल्हापूर : देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन...
कापसाच्या दरात सुधाराची चिन्हेपुणे ः ‘सीसीआयने’ कापसाला हमीभावापेक्षा  ३००...
केंद्रीय अर्थसंकल्पातून होणार सवलतींची...नवी दिल्ली ः कोरोनाच्या संसर्गामुळे...
मालविक्रीसाठी ३५ शेतकरी कंपन्या एकाच...शेतकऱ्यांना ‘शेतीमाल पिकवता येतो, मात्र विकता येत...
हंगामाच्या प्रारंभीच कोलम, आंबेमोहोर...कोल्हापूर: देशातील तांदळाचा हंगाम सुरु झाला आहे....
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ...कोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना...
सुताच्या दरात मोठी वाढजळगाव ः जगभरातील प्रमुख आयातदारांकडून सुताची मोठी...
कारखान्यांपुढे साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : गेल्या काही दिवसांत देशात वाढणारी...
हमीभावाने १८ टक्के अधिक धान्य खरेदी :...नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोव्हेंबरअखेर खरीप...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दराचा...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पंधरा...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर...नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर...