दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
अमरावतीत ८८ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड
अमरावती जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ८८,२४१ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत.
अमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाचा खरिपाला फटका बसला तरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस पोषक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ८८,२४१ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत.
रब्बी पेरणीची ही टक्केवारी ६१ असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ७७,४५० हेक्टरवर हरभरा तर ९,१३२ हेक्टरवर गव्हाचे क्षेत्र आहे.
कृषी विभागाने जमिनीतील ओलावा लक्षात घेता यावर्षी १ लाख ४५ हजार १८१ हेक्टरवर रबी लागवडीचे नियोजन केले आहे. त्या तुलनेत आजवर सुमारे ८८,२४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार, दर्यापूर तालुक्यात १९,८०५ हेक्टरवर पेरणी झाली असून, ती सर्वाधिक ९३ टक्के आहे. धारणी तालुक्यात ७,८२६ हेक्टर, चिखलदरा २,२५६ हेक्टर, अमरावती ५,१५०, भातकुली ८,०३३, नांदगाव खंडेश्वर ५,६५४, चांदूररेल्वे २८८१, तिवसा ३,५२२, मोर्शी ६,१५४, वरुड १९,८०५, अचलपूर ५,०८१, चांदूरबाजार ७,००८ व धामणगावरेल्वे तालुक्यात ६,७२३ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
तालुकानिहाय हरभरा क्षेत्र (हेक्टरमध्ये)धारणी
तालुका | क्षेत्र (हे.) | तालुका | क्षेत्र (हे.) |
धारणी | ५,३४८ | अमरावती | ४,५९७ |
चिखलदरा | १,०६७ | भातकुली | ७,९५५ |
नांदगाव खंडेश्वर | ४,३९९ | चांदूररेल्वे | २,६१७ |
तिवसा | २,९३९ | मोर्शी | ५,३१८ |
वरुड | १,९८९ | दर्यापूर | १९,६८४ |
अंजनगावसूर्जी | ४,९८९ | अचलपूर | ३,९२२ |
चांदूर बाजार | ६,५१६ | धामणगाव रेल्वे | ६,१२५ |
- 1 of 1023
- ››