agriculture news in marathi eighty eight thousand hectar Rabbi sowing in Amaravati District | Page 2 ||| Agrowon

अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवड

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

अमरावती जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ८८,२४१ हेक्‍टरवर पेरण्या आटोपल्या आहेत.

अमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाचा खरिपाला फटका बसला तरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस पोषक ठरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ८८,२४१ हेक्‍टरवर पेरण्या आटोपल्या आहेत.

रब्बी पेरणीची ही टक्‍केवारी ६१ असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ७७,४५० हेक्‍टरवर हरभरा तर ९,१३२ हेक्‍टरवर गव्हाचे क्षेत्र आहे. 

कृषी विभागाने जमिनीतील ओलावा लक्षात घेता यावर्षी १ लाख ४५ हजार १८१ हेक्‍टरवर रबी लागवडीचे नियोजन केले आहे. त्या तुलनेत आजवर सुमारे ८८,२४२ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार, दर्यापूर तालुक्‍यात १९,८०५ हेक्‍टरवर पेरणी झाली असून, ती सर्वाधिक ९३ टक्‍के आहे. धारणी तालुक्‍यात ७,८२६ हेक्‍टर, चिखलदरा २,२५६ हेक्‍टर, अमरावती ५,१५०, भातकुली ८,०३३, नांदगाव खंडेश्‍वर ५,६५४, चांदूररेल्वे २८८१, तिवसा ३,५२२, मोर्शी ६,१५४, वरुड १९,८०५, अचलपूर ५,०८१, चांदूरबाजार ७,००८ व धामणगावरेल्वे तालुक्‍यात ६,७२३ हेक्‍टरमध्ये पेरणी झाली आहे. 

तालुकानिहाय हरभरा क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)धारणी

तालुका  क्षेत्र (हे.) तालुका क्षेत्र (हे.)
धारणी ५,३४८ अमरावती ४,५९७
चिखलदरा  १,०६७ भातकुली ७,९५५
नांदगाव खंडेश्‍वर ४,३९९ चांदूररेल्वे २,६१७
तिवसा २,९३९ मोर्शी ५,३१८
वरुड १,९८९ दर्यापूर १९,६८४
अंजनगावसूर्जी ४,९८९ अचलपूर ३,९२२
चांदूर बाजार ६,५१६ धामणगाव रेल्वे ६,१२५

 


इतर बातम्या
रब्बीसाठी आवर्तन सुटले, गिरणाचे पाणी...जळगाव : खानदेशात प्रमुख प्रकल्पांमधून रब्बी व...
किसान सन्मान योजनेत नगर जिल्ह्याचा...नगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक...
तूरडाळ आयातीचे धोरण बदलावे ः खासदार...बुलडाणा : केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना...
तीन लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी...मुंबई : नवीन कृषिपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून...
बाजरीचे पीक जोमात, आंतरमशागतीसह खते...जळगाव : खानदेशात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला...
सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला सुरुवात सिंधुदुर्गनगरी ः फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि...
सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन परभणी : महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज देयक...
इथेनॉल उत्पादनाचे वेळापत्रक कोलमडले पुणे : तेल कंपन्यांची साठवणक्षमता अपुरी पडत...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...