agriculture news in marathi eighty five thousand quintal paddy procurement in Gondia | Agrowon

गोंदियात ८५ हजार क्विंटल धान खरेदी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 2 डिसेंबर 2020

गोंदिया जिल्ह्यात ६० केंद्रांवर दिवाळीनंतर धान विक्रीसाठी गर्दी वाढली आहे. त्यानुसार  मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ८५ हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात आली आहे. 

गोंदिया : जिल्ह्यात हमीभावाने खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या ६० केंद्रांवर दिवाळीनंतर धान विक्रीसाठी गर्दी वाढली आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ८५ हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात आली आहे. 

राइस सिटी अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या खरिपात एक लाख ९० हजार हेक्‍टरवर धान लागवड करण्यात आली होती. त्यातील ४० हजार हेक्टरवर हलके धान होते. दिवाळीपूर्वी हलके धान काढणीस येत असल्याने त्याची विक्री करून उसनवारी फेडत शेतकरी दिवाळी साजरी करतात.

यावर्षी मात्र हलक्‍या धानाची काढणी झाल्यावरही हमीभाव केंद्र सुरू झाले नव्हते. त्यामुळे व्यापाऱ्यांना कमी दराने धानाची विक्री करावी लागली. मात्र आता दिवाळीनंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरू झाले. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ६० केंद्रावर खरेदी होत आहे. त्या माध्यमातून आतापर्यंत ८५ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. 

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत ७० केंद्रांवर दरवर्षी धान खरेदी होते. यंदा मात्र केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुमारे १३० धान खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. या केंद्रासाठी आता पर्यंत १२९ सहकारी संस्थांनी अर्ज केले आहेत. त्यातील २३ सहकारी संस्थांचे अर्ज परिपूर्ण असल्याने त्यांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे बाजार समित्यांमध्ये देखील हमीभावानुसार खरेदी करता येणार आहे.त्यासंदर्भातील आदेश लवकरच पणन विभागाकडून निघणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारच्या कायद्यामुळे अडचणीत आलेल्या  बाजार समित्यांना संजीवनी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

तीन महिन्यांत होणार खरेदी
धान खरेदी केंद्रावर सहा महिने खरेदीची प्रक्रिया चालते. या वर्षी मात्र ही प्रक्रिया तीन महिन्यांतच पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार...पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले....
संघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने...
अण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार...नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश...
महाराष्ट्राच्या चित्ररथावर संत...राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६)...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील...
जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार...
पाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित...परभणी ः  ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत...
लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने...२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल...
पीकविमा सरसकट द्या; ‘प्रहार जनशक्ती’ची...नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी...
मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर...नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने ...
नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास...नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची...
समन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : ...नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत...
`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत...नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत...
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय...चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला...
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू...सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर...
मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर...बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन...
सांगलीत यंदा चारा टंचाई भासणार नाहीसांगली ः गेल्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी...
‘किसान गणतंत्र परेड’साठी शेतकऱ्यांचे...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी...