agriculture news in marathi eighty lakh quintal cotton in farmers stocks. start direct repurchase | Agrowon

राज्यात शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍विंटल कापूस पडून

विनोद इंगोले
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

नागपूर ः लॉकडाउनमुळे शासकीय कापूस खरेदी बंद आहे. दरवाढीच्या अपेक्षेने ७८ ते ८० लाख क्विंटल कापसाचा घरात साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे. येत्या खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या पैशांची सोय कशी करावी, तसेच कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

नागपूर ः लॉकडाउनमुळे शासकीय कापूस खरेदी बंद आहे. दरवाढीच्या अपेक्षेने ७८ ते ८० लाख क्विंटल कापसाचा घरात साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे. येत्या खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या पैशांची सोय कशी करावी, तसेच कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

सीसीआय तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून यंदा ५५५० रुपये क्विंटल या हमीभावाने कापूस खरेदी झाली. खुल्या बाजारात मात्र ४७०० ते ४९०० रुपये क्विंटल दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’कडे कापूस विक्री करण्यावर भर दिला. यावर्षी पणन महासंघाने विक्रमी ५२ लाख क्‍विंटल तर सीसीआयने ७२ लाख क्‍विंटल कापूस खरेदी केला. मात्र, सुमारे ७८ ते ८० लाख क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात असल्याचा दावा केला जात आहे.  त्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यापुढील काळात मागणी वाढून हमीभावापेक्षा दर वधारतील, अपेक्षा कापूस उत्पादकांना होती. मात्र ‘कोरोना’मुळे कापूस बाजार ठप्प झाल्याने त्यांची स्थिती अडकित्त्यात सापडल्यागत झाली आहे. 

शासनाने खरेदीचा विचार करावा
शिरुळ (ता.हिंगणा जि. नागपूर) हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. बहुतांश क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. दरवाढीच्या शक्‍यतेने कापूस साठवून ठेवला. आता मात्र आमच्यावर रडण्याची वेळ आली आहे, अशी माहिती शेतकरी विनोद येळणे यांनी दिली. कापूस वेचणीसाठी १५० रुपये मण (२० किलो) प्रमाणे मजुरी होती. येत्या हंगामाकरिता पैसे कसे उभारावे ही अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. पैसे मिळण्याबाबत भरवसा नसल्याने मशागतीकरिता ट्रॅक्‍टरचालकही येण्यास तयार नाहीत, असे विनोद येळणे यांनी सांगितले. 

राज्यात पणन महासंघाने ५२ लाख क्‍विंटल तर सीसीआयने ७२ लाख क्‍विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी केला आहे. दरवाढीच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांनी कापूस ठेवला. राज्यात सुमारे ८० लाख क्‍विंटलपेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. ‘कोरोना’मुळे खरेदी बंद असली तरी शासनाने हा कापूस खरेदी करण्याचे निदान आश्‍वासन दिले तरी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अन्यथा व्यापारी मनमानी दराने त्याची खरेदी करतील.
- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर.


इतर अॅग्रोमनी
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...