सिंधुदुर्गात ८२ हजार क्विंटल भातखरेदी

सिंधुदुर्गजिल्ह्यात या वर्षी विक्रमी भातखरेदी झाली असून, आतापर्यंत ८२ हजार २५९ हजार क्विंटल भातखरेदी झाली आहे.
सिंधुदुर्गात ८२ हजार क्विंटल भातखरेदी
सिंधुदुर्गात ८२ हजार क्विंटल भातखरेदी

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात या वर्षी विक्रमी भातखरेदी झाली असून, आतापर्यंत ८२ हजार २५९ हजार क्विंटल भातखरेदी झाली आहे. कुडाळ तालुक्यात सर्वाधिक २६ हजार ६३२ क्विंटल भातखरेदी झाली आहे. जिल्ह्यातील ६ हजार ८९० शेतकऱ्यांच्या खात्यात ११ कोटी रुपये शासनाकडून जमा झाले असून उर्वरित रक्कम जमा होण्याची प्रकिया सुरू आहे. खरीप हंगामातील भातखरेदी नोव्हेंबर २०२० पासून सुरू झाली. जिल्ह्यात ४२ भातखरेदी केंद्रे मंजूर होती. परंतु ऑनलाइन खरेदीमुळे प्रत्यक्षात जिल्ह्यातील ३५ भातखरेदी केंद्रांवरच भातखरेदीला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात पोर्टलवरील समस्येमुळे भातखरेदीला विलंब झाला होता. परंतु त्यानंतर भातखरेदी गतीने सुरू झाली. या वर्षी भाताला प्रतिक्विंटल १८६० रुपये दर आणि राज्य शासनाकडून बोनस ७०० रुपये असा २ हजार ५६८ रुपये दिला जात आहे. यांत्रिकीकरणामुळे भातशेती क्षेत्रात झालेली वाढ, त्यामुळे वाढलेले उत्पादन आणि या वर्षी भाताच्या दरात झालेली वाढ यामुळे भातविक्रीचे प्रमाण वाढले. गेल्या वर्षी केवळ ३६ हजार क्विंटल भातखरेदी झाली होती. परंतु या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ८९० शेतकऱ्यांनी ८२ हजार २५९ हजार क्विंटल भात विक्री केली आहे.  सर्वाधिक भातखरेदी कुडाळ तालुक्यात झाली असून, कुडाळ तालुक्यातील १ हजार ८८९ शेतकऱ्यांनी ९ हजार ६३ क्विंटल भातविक्री केली आहे. १५ कोटी ३६ लाख ६० रुपये रकमेची भातखरेदी झालेली आहे. त्यापैकी ११ कोटी रुपये शासनाकडून शेतकऱ्यांच्या खाती जमा झाली आहे. उर्वरित रक्कम आणि बोनसची रक्कम जमा होण्याची प्रकिया सुरू आहे. या वर्षी कुडाळ येथील बजाज राइस मिलच्या माध्यमातून शासनाने भातखरेदी केली होती. त्याचा देखील फायदा भातखरेदीला झाला.   निवजे गाव ठरले सरस श्री पद्धतीने भातलागवड करणारे कुडाळ तालुक्यातील निवजे गाव भातपिकात सरस ठरले आहे. जिल्ह्याची भात उत्पादनक्षमता प्रति हेक्टर ३२ ते ३८ क्विंटल आहे. परंतु निवजेची उत्पादनक्षमता प्रति हेक्टर ६८ ते ७० क्विंटल आहे. त्यामुळे भातविक्रीत देखील हे गाव सरस ठरले आहे. या गावातील भातखरेदी केंद्रावर ३ हजार ९०५ क्विंटल भातखरेदी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com