agriculture news in Marathi, Eknath Dawle says, trying for correct weather forecast, Maharashtra | Agrowon

मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी प्रयत्न ः एकनाथ डवले
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे वाऱ्याचा वेग, सापेक्ष आर्द्रता, तापमान, अपेक्षित पाऊस याबाबत अचूक हवामान अंदाज व सल्ला शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलद्वारे पोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांची नवीन कृषी तंत्रज्ञानाची अपेक्षा कृषी विद्यापीठांनी पूर्ण करावी, असे प्रतिपादन कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.

परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे वाऱ्याचा वेग, सापेक्ष आर्द्रता, तापमान, अपेक्षित पाऊस याबाबत अचूक हवामान अंदाज व सल्ला शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलद्वारे पोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांची नवीन कृषी तंत्रज्ञानाची अपेक्षा कृषी विद्यापीठांनी पूर्ण करावी, असे प्रतिपादन कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ४७व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (ता.१८) आयोजित खरिप पीक शेतकरी मेळाव्याचे उदघाटन श्री. डवले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होते. माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव रणजित पाटील, प्रभारी कृषी सहसंचालक संतोष आळसे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे, नियंत्रक महेश कुलकर्णी, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे,आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले आदी उपस्थित होते.

श्री. डवले म्हणाले की, कृषी विभागाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या अॅग्रीटेक प्रकल्पाच्या माध्यमातून उपग्रहाद्वारे अचूक हवामान अंदाज, पीकसंरक्षणासाठी कीड सर्वेक्षण, शास्त्रीय पद्धतीने पीक उत्पादन काढले जाणार आहे. परभणी कृषी विद्यापीठाचे कडधान्य आणि गळितधान्य, तसेच ज्वारीमध्ये अत्यंत चांगले संशोधन आहे. शेतकऱ्यांना नवीन शेती तंत्रज्ञान हवे असते, परंतु बीटी कपाशीनंतर भरीव तंत्रज्ञान आले नाही. नांदेड ४४ बीटी कपाशीच्या वाणाचे बियाणे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. कपाशीचे सरळ वाण बीटीमध्ये परावर्तित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकट्या दुकट्याने शेती करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. त्यामुळे गटशेतीचा अंगीकार आवश्यक आहे. 

श्री. दांगट म्हणाले, की एकीकडे आपल्या देशाची जगातील सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था म्हणून गणना होते, तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, ग्रामीण असंतोष, बेरोजगारी, स्थलांतर हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. जागतिकीकरणाचा सर्वाधिक फटका कृषीक्षेत्राला बसला आहे.

कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, की अन्य वाणांच्या तुलनेत अनेक बाबतींत सरस असलेल्या कपाशीच्या नांदेड ४४ वाणांच्या बियाणांची यंदा मर्यादित प्रमाणात उपलब्धता आहे. पुढील वर्षी तीन लाख पाकिटे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. फळबागांच्या रोपनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. डॉ. इंगोले यांनी प्रास्ताविक केले. वीणा भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी खरीप पिकांच्या बियाणे विक्रीचा प्रारंभ श्री.डवले यांच्या हस्ते करण्यात आला.

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...