agriculture news in Marathi eknath khadse enter in rashtrawadi Maharashtra | Agrowon

नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद पवार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खानदेश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत.

मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खानदेश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असे गौरवोद्गार काढतानाच नाथाभाऊ काय चीज आहे, हे दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. 

गेली ४० वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचे योगदान देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी (ता.२३) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. 

श्री. पवार पुढे म्हणाले, की खानदेश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचे काम नाथाभाऊंनी केले. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगरपरिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरु झाला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, की आयुष्याची ४० वर्षे भाजपमध्ये काम केले, ४० वर्षे ज्या ठिकाणी राहिलो, त्यामुळे एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही‌. विधानसभेत माझी किती बदनामी झाली, छळ केला गेला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. माझे काय चुकले? या प्रश्नाचे उत्तर मला या क्षणापर्यंत मिळाले नाही. मंत्रिमंडळातही मला संघर्ष करावा लागला. 

या वेळी नंदुरबार-तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, बोदवडच बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जिल्हा दूध फेडरेशनच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, सुदाम सोनवणे अशा ७२ नेत्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

भाजपने अडगळीत टाकले
उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला सहा जागा यायच्या, त्यातील पाच जागा कायम निवडून आणल्या. समोरासमोर लढलो पण एकमेकांबद्दल द्वेष ठेवला नाही. पाठीत खंजीर कधी खुपसला नाही. भारतीय जनता पक्षाने मला अडगळीत टाकले, आता संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती.


इतर बातम्या
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...