कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे यांचा सरकारला घरचा आहेर

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 

जळगाव जिल्हा बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. बॅंकेला या वर्षी तब्बल ५३ कोटी ७५ लाखांचा ढोबळ नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या वेळी श्री. खडसे म्हणाले, की शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाचे धोरण स्पष्ट नसल्याने द्विधा मन:स्थिती दिसून येत आहे. अगोदर एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली, त्यातही वेळोवेळी बदल केले. त्यामुळे सहकारी बॅंका व त्यांच्या शेतकरी सभासदांना अद्यापही धोरण सुस्पष्ट झालेले नाही. शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र, त्यावरील व्याज भरण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. शासन बॅंकेकडे व्याज मागते, बॅंक शेतकऱ्यांकडे व्याज मागते, शेतकरी शासनाने कर्जमुक्त केल्याचे सांगून व्याज शासनाकडून घ्यावे, असे सांगत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील व्याजाबाबत शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा, याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जळगाव येथे बुधवारी (ता. २२) करणार आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com