ज्‍येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच; परंतु पक्षादेशाने चालावे लागते ः खडसे

जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून मीच कार्यकर्ते घडविले आणि मोठे केले. त्यांना संधी दिली. माझ्या मनात श्रेयवादाची भावना कधी निर्माण झाली नाही आणि होणार नाही. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी युती केली असती तर निकालानंतर हा युतीचा विजय आहे असे म्हटले असते. मीच पक्षाला एकटे लढविण्यासाठी भाग पाडले आणि त्यामुळे भाजपचा विजय झाला. निवडणुकीत उभे असलेले सर्व ७५ उमेदवार नाथाभाऊंचे आहेत. - एकनाथ खडसे, भाजप नेते.
एकनाथ खडसे
एकनाथ खडसे

भुसावळ, जि. जळगाव   : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली.

शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलइडी पथदिव्यांसाठी झालेल्या करारानंतर श्री. खडसे शनिवारी (ता. ४) पत्रकारांशी बोलत होते. मीडियावर खडसे आणि महाजन गटामध्ये चुरस असल्याचे दाखविले जाते. आमच्यात असे कोणतेही गट-तट नाही आणि असले तर त्यासर्वांचा मीच नेता आहे असे श्री. खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले.

जळगाव महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. खडसे यांनी पक्षाला राज्यापासून जळगावला सत्तेत आणण्यासाठी आपले योगदान असून शिवसेना- भाजप युती आपणच तोडल्याचा पुर्नउच्चार केला. जळगाव महापालिका निकालाबाबत ते म्हणाले, की मी चाळीस वर्षांपासून भाजपचे काम करीत आहे. त्यातील तीस वर्षे जळगावला भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष केला. स्वत:ला श्रेय मिळावे म्हणून कधी लढा दिला नाही. अन्याय, भ्रष्टाचारावर प्रहार केले. कुणीतरी श्रेय घेण्यापेक्षा जनतेला सर्व काही माहीत आहे. नाथाभाऊंबद्दल जनतेच्या मनात इतका आदर आहे की श्रेय दिले काय आणि नाही दिले काय काहीएक फरक पडत नाही. ज्याला श्रेय मिळत नाही त्यांना श्रेय द्या.

जळगाव महापालिकेतील भाजपचा विजय हा सर्वांचा विजय आहे. पक्षात कुठलीही घुसमट नाही. कोणी सोबत नसताना मी एकट्याने जळगावला जागा लढविल्या होत्या. प्रतिकूल परिस्थितीत मी एकट्याने डॉ. के. डी. पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले, त्यानंतर विरोधात असताना ३४ नगरसेवक निवडून आणले ते एकट्याच्या बळावर.  विधानसभेच्या निवडणुकीतही राज्यात मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली म्हणून भाजपला यश मिळाले, असेही ते म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com