agriculture news in marathi, eknath khadse speak on cheif minister issue, mumbai, maharashtra | Agrowon

मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरेंनी सांगावे ः एकनाथ खडसे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी सांगावे म्हणजे मुख्यमंत्री कुणाचा यावरून वादविवाद होणार नाही, असा उपरोधिक सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला. 
विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आभाराचा ठराव मांडला. त्या ठरावावर बोलताना खडसे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांसह राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही टोले लगावले. मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये सध्या वादाची ठिणगी पडत आहे. त्यापार्श्वभूमीवर खडसे यांनी हे वक्तव्य केले.

मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी सांगावे म्हणजे मुख्यमंत्री कुणाचा यावरून वादविवाद होणार नाही, असा उपरोधिक सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला. 
विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आभाराचा ठराव मांडला. त्या ठरावावर बोलताना खडसे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांसह राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही टोले लगावले. मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये सध्या वादाची ठिणगी पडत आहे. त्यापार्श्वभूमीवर खडसे यांनी हे वक्तव्य केले.

विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाचा ठसा उमटवला, पण अचानक त्यांनी राजीनामा का दिला आणि सत्तेत का आले ते कळले नाही. आई म्हणते "बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले उतराई", तसे आता वड्डेटीवार यांना विखेंना म्हणावे लागेल ‘‘तुझा होऊ कसा उतराई’’ अशा मिश्किल शैलीत श्री. खडसे यांनी वड्डेटीवार यांचे अभिनंदन केले. या वेळी श्री. खडसे म्हणाले, की मी सत्ताधारी पक्षात आहे हे कधी कधी मी विसरून जातो, विरोधी पक्षनेत्याचे गुण अजून माझ्यातून गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना कधी कधी वाटत असेल की मी विरोधी पक्षात जातो की काय, पण मी विखे पाटील यांचा आदर्श ठेवणार नाही, मी करायचे असते तर आधीच पक्षांतर केले असते. आता पक्षांतर करणार नाही, असे सांगत त्यांनी मी विखे यांची पक्षांतराची परंपरा सुरू ठेवणार नाही, असा टोला विखे यांना लगावला.

गिरीश महाजन आत्ता आले, आधी ते निर्णयाच्या प्रकियेत नव्हते. ते जवळ झाले, विखेंना मंत्रिपद मिळाले आणि मुनगंटीवार दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेले, असे सांगत त्यांनी गिरीश महाजन आणि मुनगंटीवार यांनाही चिमटा काढला. सरकार विरोधात वातावरण निर्मिती करून आपले सरकार आले पाहिजे ही विरोधी पक्ष नेत्याची भूमिका, भाजपचे सरकार येण्यात (आधीच्या) विरोधी पक्ष नेत्याची  भूमिका महत्त्वाची होती, असे सांगत स्वतःवर झालेल्या अन्यायाबाबत अप्रत्यक्षपणे खडसे यांनी भाषणात नाराजी व्यक्त केली. मात्र आता आमचे आणि मुख्यमंत्र्यांचे ठरले आहे. आमच्यात नेमके काय ठरलंय, ते मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहीत आहे. काय ठरलेय ते सांगा अशी मागणी सदस्यांनी केल्यावर, उद्धवजींना तेच म्हणतो काय ठरले ते सांगा, मुख्यमंत्री कुणाचा हा वादविवाद त्यामुळे होणार नाही, असा उपरोधक सल्ला देत खडसे यांनी विषयाला बगल दिली. 

`तुम्ही फोडाफोडीचे राजकारण करू नका`
काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांची सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी ही घोषणा केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू होती. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की सरकारचा कारभार नीट चालावा यासाठी सक्षम विरोधी पक्षनेत्याचीही गरज असते. धोरणात्मक विरोध करून विजय वडेट्टीवार त्यांची भूमिका योग्य पद्धतीने निभावतील अशी खात्री आहे. काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना संधी देतो आणि निवडणूक संपल्यावर त्यांना बाजूला करून दुसऱ्याला संधी दिली जाते. मात्र मला विश्वास आहे की आता विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने पुढेही वडेट्टीवार यांना संधी द्यावी असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या कुणाला तरी संधी द्यायची असे करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच तुम्ही फोडाफोडीचे राजकारण करू नका असे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी मिश्किल उत्तर दिले. फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक कोण आहेत ते आठवा असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...