‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता कायम

नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा मंडळाला सर्व २१ जागांवर विजय मिळाला. विरोधी पॅनेलने जोरदार वातावरण तयार केले होते. मात्र मतांत त्याचे रूपांतर झाले नाही.
In the election of 'Ashok' The power of ‘public service’ remains
In the election of 'Ashok' The power of ‘public service’ remains

नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा मंडळाला सर्व २१ जागांवर विजय मिळाला. विरोधी पॅनेलने जोरदार वातावरण तयार केले होते. मात्र मतांत त्याचे रूपांतर झाले नाही.

श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याच्या स्थापनेपासून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची सत्ता आहे. या वेळीच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेने इतरांच्या मदतीने पॅनेल उभे केले होते. मुरकुटे यांच्या विरोधात खुद्द त्यांच्या सून डॉ. वंदना मुरकुटे रिंगणात होत्या. मुरकुटे यांच्यावर वेगवेगळे आरोप करत विरोधी वातावरण तयार केले होते. मात्र मतमोजणीनंतर विरोधी वातावरणाचे मतात रूपांतर झाले नसल्याचे स्पष्ट झाले. भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा पॅनेलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार विजयी झाले. 

‘‘‘अशोक’च्या सभासदांचा माझ्यावर पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे सभासदांचे हित हीच माझी विश्‍वासार्हता राहील, असा विश्वास मुरकुटे यांनी व्यक्त केला.

विजयी उमेदवार

माजी आमदार भानुदास मुरकुटे, ज्ञानदेव पटारे, पुंजाहरी शिंदे, कोंडिराम उंडे, रामभाऊ कासार, ज्ञानेश्‍वर काळे, बाबासाहेब आदिक, वीरेश गलांडे, आदिनाथ झुराळे, भाऊसाहेब उंडे, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्‍वर शिंदे, रावसाहेब थोरात, हिम्मतराव धुमाळ, यशवंत बनकर, शीतल गवारे, हिराबाई साळुंके, अमोल कोकणे, यशवंत रणनवरे, योगेश विटनोर, सोपान राऊत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com