सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वर

सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वर
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वर

नागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडत शक्‍तिप्रदर्शन करीत असल्याने ग्रुप ॲडमिनच्या अडचणीत वाढ झाली आहे.  टीव्ही चॅनल, फेसबुक, व्हॉटसॲप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियावर आजच्या घडीला लोकसभा निवडणुकीची चर्चा रंगली आहे. त्यातही व्हॉटसॲप ग्रुप आघाडीवर आहेत. प्रत्येक गृपवर सर्वच पक्षांचे समर्थक आणि विरोधक असतात. त्यांच्याद्वारे आपला उमदेवार व पक्ष कसा सरस आहे, याचे वर्णन केले जाते. मात्र ही चर्चा वैयक्‍तिक पातळीवर जात असून, यावरून वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे विविध व्हॉटसॲप ग्रुपचे ॲडमिनसुद्धा अडचणीत आले असून, समर्थकांची समजूत घालताना त्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. २०१४ या वर्षातील निवडणुकांपासून सोशल मीडियाचा प्रचाराकामी वापर होऊ लागला. त्यातच स्थानिक पातळीवरील घडामोडीची माहिती होण्याच्या उद्देशाने व्हॉटसॲप ग्रुप तयार करण्यात आले. काही राजकीय पक्षांनी तर निवडणुका पाहून विविध व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. तर काही सामाजिक संस्था आणि शासकीय कर्मचाऱ्यांचेसुद्धआ गृप आहेत. मात्र मागील पंधरा दिवसांपासून या सर्व ग्रुपवर निवडणुकांना घेऊनच चर्चा होत आहे. काही व्हॉटसॲप ग्रुपचे ॲडमिनसुद्धा पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांचीसुद्धा चांगलीच अडचण यामुळे होत आहे. याच कारणांमुळे मित्रांमध्ये कटुता निर्माण होत वादाचे प्रकारही घडत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com