agriculture news in marathi, election campaign on social media | Page 2 ||| Agrowon

सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

नागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडत शक्‍तिप्रदर्शन करीत असल्याने ग्रुप ॲडमिनच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

नागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडत शक्‍तिप्रदर्शन करीत असल्याने ग्रुप ॲडमिनच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

टीव्ही चॅनल, फेसबुक, व्हॉटसॲप, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियावर आजच्या घडीला लोकसभा निवडणुकीची चर्चा रंगली आहे. त्यातही व्हॉटसॲप ग्रुप आघाडीवर आहेत. प्रत्येक गृपवर सर्वच पक्षांचे समर्थक आणि विरोधक असतात. त्यांच्याद्वारे आपला उमदेवार व पक्ष कसा सरस आहे, याचे वर्णन केले जाते. मात्र ही चर्चा वैयक्‍तिक पातळीवर जात असून, यावरून वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे विविध व्हॉटसॲप ग्रुपचे ॲडमिनसुद्धा अडचणीत आले असून, समर्थकांची समजूत घालताना त्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

२०१४ या वर्षातील निवडणुकांपासून सोशल मीडियाचा प्रचाराकामी वापर होऊ लागला. त्यातच स्थानिक पातळीवरील घडामोडीची माहिती होण्याच्या उद्देशाने व्हॉटसॲप ग्रुप तयार करण्यात आले. काही राजकीय पक्षांनी तर निवडणुका पाहून विविध व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. तर काही सामाजिक संस्था आणि शासकीय कर्मचाऱ्यांचेसुद्धआ गृप आहेत. मात्र मागील पंधरा दिवसांपासून या सर्व ग्रुपवर निवडणुकांना घेऊनच चर्चा होत आहे. काही व्हॉटसॲप ग्रुपचे ॲडमिनसुद्धा पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांचीसुद्धा चांगलीच अडचण यामुळे होत आहे. याच कारणांमुळे मित्रांमध्ये कटुता निर्माण होत वादाचे प्रकारही घडत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात पणन महासंघातर्फे दोन...परभणी : ‘‘महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
पगारासाठी ‘आदिनाथ’च्या कामगारांचे आंदोलनकरमाळा, जि. सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ...
नगर जिल्ह्यात कांद्याला मिळाला वीस...नगर ः जिल्ह्यातील घोडेगाव (नेवासा), नगर, पारनेर...
राजू शेट्टी यांना कृषिमंत्री करा,...सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी...
मोर्शी तालुक्‍यातील कपाशीला वगळले पीक...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
पुणे : ज्वारी पीक अमेरिकन लष्करी...पुणे ः यंदा खरीप हंगामात मका, कपाशीचे मोठ्या...
उभी पिके वन्यप्राण्यांकडून फस्त; शेतकरी...ढेबेवाडी, जि. सातारा : पीक काढणी सुरू असतानाच...
नाशिक जिल्ह्यात मजूरटंचाईचा फटका; भात...नाशिक : जिल्ह्यातील मुख्य भात पट्टा असलेल्या...
सिन्नर तालुक्यात दरवाढीमुळे कांदा...नाशिक : अतिवृष्टीमुळे कांद्याच्या रोपांची मोठ्या...
नगर जिल्ह्यात हरभरा पेरणीलाही वेग येईना नगर ः जिल्ह्यात रब्बीत हरभऱ्याची सुमारे १ लाख २०...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणीत पावसाचा ‘...कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू...
‘ताकारी’च्या पूर्णत्वासाठी ४९० कोटींची...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित...
होय, पश्‍चिम विदर्भातही धान उत्पादन शक्यअकोला ः राज्यात धानाचे पीक पूर्व विदर्भात मोठ्या...
‘कृषी विभागाने केलेले पंचनामेच...नगर ः आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे...
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांची...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीज ॲण्ड ॲ...
ढगाळ हवामानाने वाढविली द्राक्ष...सांगली ः जिल्ह्यात रात्रभर पडलेला पाऊस आणि ढगाळ...
राज्य सरकारचा बुलेट ट्रेनला ब्रेकमुंबई  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार...
चिमुकलीने गावातील अस्वच्छतेची कैफियत...अमरावती ः रस्त्यावरील सांडपाणी, अस्वच्छता आणि...
उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी...नाशिक : जिल्ह्यात सर्व सहकारी साखर कारखाने बंद...
पंकजा मुंडेंची पोस्ट समर्थकांना केवळ...बीड : माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा...