राज्यात दसऱ्यानंतर उडणार प्रचाराचा धुराळा

राज्यात दसऱ्यानंतर उडणार प्रचाराचा धुराळा
राज्यात दसऱ्यानंतर उडणार प्रचाराचा धुराळा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दसऱ्याच्या सणानंतर रंग भरणार आहे. विविध राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक पुढील दोन आठवडे राज्यात प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत.

दरवर्षी मुंबईत शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात शिवसेनेचे प्रमुख शिवसैनिकांना आवाहन करत असतात. यंदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बीड जिल्ह्यातील भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. भगवान गड हे राज्यातील वंजारी समाजाचे श्रद्धास्थान आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे हा याच गडावरून राजकीय घोषणा करत. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वंजारी समाजाचे राजकारण त्यांच्या कन्या पंकजा मुडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्याभोवती केंद्रित झाले आहे. पंकजा मुंडे यांनी थेट शहा यांना गडावर पाचारण केले आहे. या वेळी अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.   शरद पवार, राज ठाकरेही मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे हे येत्या ९ तारखेला प्रचारासाठी बाहेर पडणार आहेत. ते पुण्यातही जाहीर सभा घेणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सध्या झंझावती बैठका, पत्रकार परिषदा विविध जिल्ह्यांत सुरू आहेत. शरद पवार हे दसऱ्यानंतर जाहीर सभांतून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात रान उठवणार आहेत. काँग्रेसचे स्टार प्रचारक ही राज्यात फिरणार आहेत. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आदी सहभागी होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com