agriculture news in marathi, election campaign starts after dushera, mumbai, maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात दसऱ्यानंतर उडणार प्रचाराचा धुराळा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दसऱ्याच्या सणानंतर रंग भरणार आहे. विविध राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक पुढील दोन आठवडे राज्यात प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत.

दरवर्षी मुंबईत शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात शिवसेनेचे प्रमुख शिवसैनिकांना आवाहन करत असतात. यंदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दसऱ्याच्या सणानंतर रंग भरणार आहे. विविध राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक पुढील दोन आठवडे राज्यात प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत.

दरवर्षी मुंबईत शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात शिवसेनेचे प्रमुख शिवसैनिकांना आवाहन करत असतात. यंदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बीड जिल्ह्यातील भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. भगवान गड हे राज्यातील वंजारी समाजाचे श्रद्धास्थान आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे हा याच गडावरून राजकीय घोषणा करत. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वंजारी समाजाचे राजकारण त्यांच्या कन्या पंकजा मुडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्याभोवती केंद्रित झाले आहे. पंकजा मुंडे यांनी थेट शहा यांना गडावर पाचारण केले आहे. या वेळी अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.
 
शरद पवार, राज ठाकरेही मैदानात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे हे येत्या ९ तारखेला प्रचारासाठी बाहेर पडणार आहेत. ते पुण्यातही जाहीर सभा घेणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सध्या झंझावती बैठका, पत्रकार परिषदा विविध जिल्ह्यांत सुरू आहेत. शरद पवार हे दसऱ्यानंतर जाहीर सभांतून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात रान उठवणार आहेत. काँग्रेसचे स्टार प्रचारक ही राज्यात फिरणार आहेत. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आदी सहभागी होणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
उस्मानाबादेतील कर्जमुक्तीच्या याद्या...उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मराठवाड्यातील कोरड्या पडणाऱ्या...औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा उन्हाच्या...
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...