agriculture news in marathi, election campaigning stop, mumbai, maharashtra | Agrowon

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा थंडावल्या

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर राज्यभरात सुरू झालेल्या झंझावाती निवडणूक प्रचाराची सांगता शनिवारी (ता.१९) सायंकाळी झाली. त्याआधी प्रचाराचे शिल्लक राहिलेले काही तास सार्थकी लावण्यावर राजकीय नेते आणि उमेदवारांचा भर दिसून आला. सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील सर्व दिग्गज नेते मैदानात उतरल्याचे दिसून आले, ज्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळाला. 

मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर राज्यभरात सुरू झालेल्या झंझावाती निवडणूक प्रचाराची सांगता शनिवारी (ता.१९) सायंकाळी झाली. त्याआधी प्रचाराचे शिल्लक राहिलेले काही तास सार्थकी लावण्यावर राजकीय नेते आणि उमेदवारांचा भर दिसून आला. सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील सर्व दिग्गज नेते मैदानात उतरल्याचे दिसून आले, ज्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळाला. 

शनिवारी दिवसभरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा पार पडल्या. विशेषतः साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभांकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागले होते. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी सहा वाजता संपली. त्यामुळे उमेदवारांनी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचाराचे नियोजन केले होते. पदयात्रा, प्रचारफेरी, मतदारांच्या भेटीगाठी, दुचाकी रॅली आदींच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करून मतदारांना आकर्षित करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न दिसून आला. शेवटच्या दिवसात मतदारसंघातील जास्तीत जास्त भाग पिंजून काढण्याचा उमेदवारांचा प्रयत्न राहिला.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपसह प्रमुख पक्षांनी ठिकठिकाणी नेत्यांच्या जंगी सभांचे आयोजन केले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नंदुरबार आणि नगर जिल्ह्यात तीन सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची नवी मुंबईत; तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर, वर्ध्यात सभा झाली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या जळगाव, यवतमाळमध्ये तीन; तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई, ठाण्यात सभा पार पडल्या. 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील माण, महाड, श्रीवर्धन, उरण आणि कर्जतमध्ये सभा घेतल्या. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावी, चांदिवली, वांद्रे पूर्व येथे शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारफेरी काढली. आदित्य ठाकरे यांची शेवटची प्रचारफेरी वरळीत झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवी मुंबई आणि ठाण्यात सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.

साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेनंतर शरद पवार यांच्या सभांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. नातू रोहित पवार यांच्यासाठी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे शरद पवार यांची जोरदार प्रचारसभा पार पडली. या सभेवर पावसाचे सावट होते. त्यानंतर शरद पवार यांनी परंपरेप्रमाणे बारामतीमध्ये प्रचाराचा शेवट केला. 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...