पुणे : पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदासाठी आज निवडणूक

पुणे : पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदासाठी आज निवडणूक
पुणे : पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदासाठी आज निवडणूक

पुणे ः पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांना या वर्षाच्या अखेरीस नवे कारभारी मिळणार आहे. मंगळवारी (ता. ३१) सभापती आणि उपसभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे नवीन सभापती व उपसभापतिपदी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १३) पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृह येथे सोडत काढण्यात आली होती. 

पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांकरिता आरक्षण जाहीर करावयाचे होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सात ठिकाणी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. 

यामध्ये बारामतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), दौंडमध्ये सर्वसाधारण (महिला), हवेलीत अनुसूचित जाती (महिला), इंदापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), मावळमध्ये सर्वसाधारण (महिला), पुरंदर सर्वसाधाण (महिला), शिरूर सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण जाहीर झाले, तर आंबेगावमध्ये अनुसूचित जमाती, भोरमध्ये सर्वसाधारण, जुन्नर नागरिकांचा मागास प्रवर्ग, खेड नागरिकांचा मागास प्रवर्ग मुळशी सर्वसाधारण आणि वेल्हा सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे.  

जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, मुळशी, शिरूर या सात पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तर जुन्नर, खेड, पुरंदर या पंचायत समित्या शिवसेनेकडे आहेत. इंदापूर आणि वेल्हा या कॉंग्रेसकडे, तर मावळ ही एकमेव पंचायत समिती भाजपकडे आहे, तर राज्यात नवे समीकरणे जुळून महाविकास आघाडी सरकार आले असल्यामुळे सर्वच पंचायत समितीवर कोणाची वर्णी लागणार आहे, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com