agriculture news in Marathi election commission trying to election of grampanchayt Maharashtra | Agrowon

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची चाचपणी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित १९ जिल्ह्यातील १,५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे.

मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित १९ जिल्ह्यातील १,५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. 

ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे आणि जेथे मतदान घेणे शक्य आहे, अशा ग्रामपंचायतीचा सविस्तर अहवाल आयोगाला तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्यातील संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. 

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १९ जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र छाननी १७ मार्च २०२० रोजी होती.

मात्र, दरम्यानच्या काळात राज्यात कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज १७ मार्च २०२० रोजी ज्या टप्प्यावर असतील त्या टप्यावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. त्यामुळे हे निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशनपत्र छाननीच्या टप्प्यावरच स्थगित करण्यात आलेले आहेत. 

सध्या, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील सद्यःस्थितीचा अंदाज घेऊन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या विचारात आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील ३१ मार्च २०२० रोजीचे मतदान तहकूब केलेल्या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या ग्रामपंचायतीतील हद्दीतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे, जेथे मतदान घेणे शक्य आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या २१ सप्टेंबर २०२० पर्यंत आयोगास सादर करावा असे निर्देश आयोगाने दिले आहेत. जेणेकरुन आयोगाला निवडणुकीबाबत निर्णय घेणे शक्य होईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा व गडचिरोली या १९ जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने पत्र पाठवले आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...