Agriculture news in marathi; Election Commission's Illustration from Human Chains in Washim | Agrowon

वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून मतदार जागृतीसाठी वाशीम येथील पोलिस कवायत मैदानावर मंगळवारी (ता. १५) सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी एकत्र येत मानवी साखळीतून भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह (लोगो) साकारला. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जागतिक विक्रम म्हणून या उपक्रमाची नोंद झाली असून, यामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून मतदार जागृतीसाठी वाशीम येथील पोलिस कवायत मैदानावर मंगळवारी (ता. १५) सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी एकत्र येत मानवी साखळीतून भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह (लोगो) साकारला. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जागतिक विक्रम म्हणून या उपक्रमाची नोंद झाली असून, यामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, अंगणवाडीसेविका, बचत गटातील महिला, आशा कर्मचारी, महिला यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हामध्ये असलेल्या हिरवा, पांढरा, केशरी, काळा व करड्या रंगाच्या टोप्या परिधान करून सर्व विद्यार्थी, महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

सलग तिसऱ्या वर्षी जागतिक विक्रमाची नोंद
मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने आयोजित केलेल्या उपक्रमात सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी सहभाग घेतला. या विक्रमाची जागतिक विक्रम म्हणून ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. प्रशासनामार्फत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक विक्रम नोंदविला गेला आहे. यापूर्वी २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ७ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी साखळीद्वारे ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो (महात्मा गांधी यांचा चष्मा) साकारला होता. त्यानंतर ८ मार्च २०१८ रोजी ८३१८ महिला व मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’चा लोगो साकारून विक्रम स्थापित आहे. 

इतर बातम्या
शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायममुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे...
संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम...नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...