Agriculture news in marathi, Election of Gram Panchayats in Nagpur district | Agrowon

नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नागपूर : जिल्ह्यात ३८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. या घोषणेनंतर आता राजकीय धुळवडीला चांगलाच रंग चढणार आहे. 

नागपूर : जिल्ह्यात ३८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. या घोषणेनंतर आता राजकीय धुळवडीला चांगलाच रंग चढणार आहे. 

नागपूर जिल्ह्यात ३८१ ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच थेट सरपंचही निवडले जाणार आहेत. यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये एका सदस्याची भर पडणार आहे. यासोबतच रामटेक तालुक्‍यातील एका ग्रामपंचायतमधील रिक्‍त जागेसाठी पोटनिवडणूक याच दिवशी होईल. ऑक्‍टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मिती ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हे मतदान होत आहे.

या निवडणुकीत सदस्यांपासून थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा समावेश आहे. त्यासाठी नामनिर्देशणपत्र ५ ते ११ सप्टेंबर २०१८ या कालावधीत स्वीकारले जातील. छाननी १२ सप्टेंबर २०१८ रोजी होईल. नामनिर्देशणपत्रे १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत मागे घेता येतील. मतदान २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळात होईल. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगण्यास सुरवात झाली आहे. 

तालुकानिहाय ग्रामपंचायती

नागपूर (ग्रामीण)     ३५
काटोल  ५३
कळमेश्‍वर     २२
सावनेर   २७
पारशिवणी   १९
भिवापूर ३६
रामटेक  २८
हिंगणा ४१
मौदा ३१
कुही   २२
उमरेड २६

 


इतर बातम्या
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...