Agriculture news in marathi Election of Nagar District Bank Mahavikas should fight with the front | Agrowon

नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने लढवावी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जानेवारी 2021

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने एकत्र लढावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  केली आहे.

नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने एकत्र लढावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  केली आहे. रविवारी (ता. २४) काही कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. त्या बाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवारी (ता. २७) मुंबईत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.  

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या राजकारणात लोणीचे विखे पाटील, संगमनेरचे थोरात, कोपरगावचे काळे पाटील, पाथर्डीचे राजळे, नेवाशाचे गडाख, शेवगावचे विखे, श्रीगोंद्याचे जगताप व नागवडे, नगरचे कर्डिले, जगताप या कुटुंबाचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या वेळी विखे पाटील भाजपमध्ये आहेत. भाजपने स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवाय राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे या वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूकही महाविकास आघाडीने एकत्र लढवण्याचा तयारी केली आहे, तशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे असा सामना नगर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. 
महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक होत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ मार्गदर्शन करतील.

जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी बैठकीस यावे, असे आवाहन पवार यांनी केले. नगर येथे कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नरेंद्र घुले, राहुल जगताप, पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते. चंद्रशेखर घुले यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत माहिती दिली.


इतर ताज्या घडामोडी
पांडुरंग साखर कारखाना उताऱ्यात...सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याने २५ लाख ७७...
अकोला झेडपीच्या कृषी विभागाचे दहा...अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाला आगामी आर्थिक...
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नाशिक : जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या...
कपाशीचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज ः...नांदेड ः ‘‘जगाच्या तुलनेत आपल्या देशात कपाशीची...
खानदेशातील तुरीच्या आवकेत ४० टक्के घटजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
कीटकनाशक फवारणीला अनुदान द्या : आंबा...मुंबई : कोकण किनारपट्टीच्या भागात १८ व १९...
पारनेर : महावितरणच्या विरोधात शेतकरी...निघोज, ता. पारनेर : विहिरीत पाणी असूनही पिकांना...
खानदेशात ऊसगाळप राहणार मार्चअखेरपर्यंत...जळगाव ः  खानदेशात सुमारे १६ लाख टन ऊस गाळप...
कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन,...कोल्हापूर : आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनासाठी...
शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका ः डॉ. पवारनाशिक : ‘‘वीज महावितरणच्या मनमानी...
संभाव्य निर्बंध, लॉकडाउनमुळे द्राक्ष...नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात...
सिंधुदुर्गमध्ये होणार ड्रोनद्वारे होणार...सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या स्वामित्व योजनेतर्गत...
मराठीला अभिजात दर्जा मिळविणारच :...मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला,...
खामसवाडीत नुकसानग्रस्त पिकांची होणार...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : परिसरात १९ फेबुवारी...
किमान २५ टक्के शेतीमालावर प्रक्रिया...जालना : ‘‘उत्पादित केलेल्या किमान २५ टक्के...
नगर जिल्ह्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांना...नगर ः जिल्ह्यातील २०१९ - २० चा खरीप व रब्बी हंगाम...
सोसायट्यांच्या वसुलीपूर्वी प्रोत्साहन...सातारा : आता मार्च महिन्यात सोसायट्यांची...
केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनएकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे पिकास...
सकाळी थंड, तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
अकोला : अवकाळी, गारपीटग्रस्तांना १७...अकोला ः गेल्या वर्षात जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे...