नगर जिल्हा बॅंकेची निवडणूक ठरलेल्या कार्यक्रमानुसारच

मागील वर्षी म्हणजे २०२०मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली असली तरी नगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक मात्र जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसारच होणार आहे.
नगर जिल्हा बॅंकेची निवडणूक ठरलेल्या कार्यक्रमानुसारच Election of Nagar District Bank as per schedule
नगर जिल्हा बॅंकेची निवडणूक ठरलेल्या कार्यक्रमानुसारच Election of Nagar District Bank as per schedule

नगर : मागील वर्षी म्हणजे २०२०मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली असली तरी नगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक मात्र जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसारच होणार आहे. जिल्ह्यातील इतर १ हजार ९१६ संस्थांच्या निवडणूका मात्र मार्च नंतर होणार आहेत.   कोरोना साथ आटोक्‍यात येण्यास कालावधी लागणार असल्याने राज्य सरकारच्या सहकार विभागाने २०२०मध्ये मुदत संपलेल्या आणि न्यायालयाचा आदेश वगळता अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा मार्च २०२१ पर्यंत म्हणजे तीन महिने पुढे ढकल्या आहेत. जिल्ह्यात २०२०मध्ये मुदत संपलेल्या १ हजार ९१६ संस्था असून, या संस्थांच्या निवडणुका आता मार्च २०२१ नंतरच होणार आहेत. महाराष्ट्र सहकारी अधिनियमाचे कलम १९६०च्या कलम ‘क’ मधील तरतुदीनुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुका एक वर्षांहून कमी काळासाठी पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्या अधिकाराचा वापर करत सरकारने करोना संसर्ग आटोक्‍यात येण्यास विलंब होणार असल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिन्यांसाठी पुढे ढकल्या आहेत. मात्र, पुढे ढकलण्यात आलेल्या संस्थांमध्ये न्यायालयाने निवडणुका घेण्याचा आदेश दिलेल्या संस्थांना वगळण्यात आले आहे. यात नगरच्या जिल्हा बॅंकेसह जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांचा समावेश असून, यांच्या निवडणुका सुरू राहणार आहेत. पण २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या ‘अ’ वर्गातील ८८८, ‘ब’ वर्गातील ५५१ आणि ‘क’ वर्गातील ४७७, अशा एकूण १ हजार ९१६ संस्थांच्या निवडणुका या तीन महिन्यांसाठी पुढे गेल्या आहेत.

प्रतिक्रिया मागील वर्षी २०२०मध्ये मुदत संपत असलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बॅंकेसह तीन साखर कारखान्यांची निवडणूक मात्र जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसारच होणार आहे.  दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com