धर्माबाद बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया तूर्त स्थगित

धर्माबाद बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया तूर्त स्थगित
धर्माबाद बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया तूर्त स्थगित

नांदेडः धर्माबाद कृषी उत्‍पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया तूर्त पुढील आदेशापर्यंत स्‍थगित करण्‍यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. उच्‍च न्‍यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (ता. ११) दिलेल्‍या आदेशानुसार ही स्थगिती देण्यात आली आहे.

पुणे येथील राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या आदेशानुसार धर्माबाद कृषी उत्‍पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया १० ते २० दिवसांत सुरू करण्‍याबाबत आदेश प्राप्त होते. परंतु धर्माबाद येथील संजय रामपुरे यांनी उच्‍च न्‍यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धर्माबाद तालुक्‍यातील माष्‍टी, पाटोदा थडी आणि शेळगाव ही गावे धर्माबाद कृषी उत्‍पन्न बाजार समितीमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यासाठी विनंती केली होती. ही तीन गावे राज्‍य सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्‍या अर्हता ता. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्‍ये समाविष्‍ट होती.

जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था यांच्या कडील अधिसूचना ता. ३० जानेवारी २०१८ नुसार ही गावे धर्माबाद बाजार समितीमध्‍ये समाविष्‍ट केली. त्‍यामुळे याचिकाकर्ते रामपुरे यांच्या मागणीनुसार बुधवारी (ता. ११) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या तीन गावांतील शेतकऱ्यांचा समावेश मतदार यादीमध्‍ये केल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com