agriculture news in marathi, The election process of Mudkhed Agricultural Produce Market Committee is going on | Agrowon

मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 जुलै 2018

नांदेड ः जिल्ह्यातील मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार (ता. १२) पासून सुरू झाली असून, बुधवार (ता. १८)पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल येतील. शुक्रवार (ता. ३ आॅगस्ट)पर्यंत अर्ज मागे घेता येतील. शनिवारी (ता. ११ आॅगस्ट) मतदान घेण्यात येईल. तर रविवारी (ता. १२ आॅगस्ट) मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील. नवीन निवडणूक प्रक्रियेनुसार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांतील ८ हजार ७१३ शेतकरी प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नांदेड ः जिल्ह्यातील मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार (ता. १२) पासून सुरू झाली असून, बुधवार (ता. १८)पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल येतील. शुक्रवार (ता. ३ आॅगस्ट)पर्यंत अर्ज मागे घेता येतील. शनिवारी (ता. ११ आॅगस्ट) मतदान घेण्यात येईल. तर रविवारी (ता. १२ आॅगस्ट) मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील. नवीन निवडणूक प्रक्रियेनुसार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांतील ८ हजार ७१३ शेतकरी प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बाजार समिती निवडणुकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक विषयक पूर्वतयारी व आचारसंहिता अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित विभागप्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या कक्षात घेण्यात आली, त्या वेळी श्री. डोंगरे बोलत होते.

निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनुराधा ढालकरी, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एन. व्ही. सांगडे, सहायक निवडणूक अधिकारी तथा मुदखेडचे तहसीलदार सुरेश घोळवे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुदखेड बाजार समितीच्या १८ संचालक मंडळामध्ये शेतकरी मतदारसंघातून १५ संचालक, व्‍यापारी मतदारसंघातील २ संचालक, हमाल मापाडी मतदारसंघातील १ संचालक निवडून द्यावयाचा आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी मतदारसंघातील १५ गणामध्ये एकूण ८ हजार ७१३ मतदार, व्‍यापारी मतदारसंघामध्ये १५३, हमाल-मापाडी मतदारांमध्ये ३३ मतदार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...