शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर
शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर

मुंबई : मतदार असलेले शिक्षक उन्हाळी सुटीवर गेल्याने 8 जूनला होणारी शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या निवडणुकांची नवीन तारीख लवकरच निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. ही निवडणूक 18 जूननंतर होण्याचा अंदाज आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 8 जूनला घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. सुटी असल्याने शिक्षक बाहेरगावी गेले असल्याने 8 जून या मतदानादिवशी अनेक शिक्षक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले असते. याप्रकरणी आमदार कपिल पाटील यांनी दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांची भेट घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाली असून लवकरच निवडणुकीची सुधारित तारीख जाहीर होणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही विद्यमान विधान परिषद सदस्यांची मुदत 7 जुलैला संपणार आहे. या जागांवर नव्याने उमेदवार निवडीसाठी ही निवडणूक होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com