निवडणूक निकाल अनपेक्षित : प्रफुल्ल पटेल

निवडणूक निकाल अनपेक्षित : प्रफुल्ल पटेल
निवडणूक निकाल अनपेक्षित : प्रफुल्ल पटेल

भंडारा : हमीभाव, नोटाबंदी, कर्जमाफीसारख्या मुद्द्यांवरून शेतकरी, सामान्यांना वेठीस धरण्यात आले. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. निवडणुकीपूर्वी कोणतीही लाट नव्हती, अशा परिस्थितीत लागलेला निकाल, हा अनपेक्षित असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 

स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी खासदार मधुकर कुकडे, नाना पंचबुद्धे, अनिल बावनकर, नरेश डहारे, धनंजय दलाल उपस्थित होते.  पटेल म्हणाले, ‘‘या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. निवडणुकीत जय, पराजय होत राहतो. ५० ते ८० हजार मतांपर्यंत फरक अपेक्षित होता. परंतु, राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार एक लाख ९७ हजार मतांनी पराभूत होणे अशक्‍य वाटते.''

‘‘तिरोडा, लाखांदूर या भागांतून राष्ट्रवादी कॉँग्रेसला सर्वाधिक मते मिळण्याची आशा होती. यापूर्वी बॅलेट पेपरचा वापर करून निवडणूक घेण्याबाबत तीन वेळा सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. परंतु न्यायालयाने प्रत्येक वेळी परत पाठविले. निवडणुकीत प्रत्येक गावातील बूथवर आम्ही मागे पडलो आहोत. त्यामुळे मतदारांना समजून घेण्यात कुठे कमी पडलो, असा प्रश्‍न आहे.

 निवडणुकीच्या निकालानंतर सामान्य नागरिकात कोणताही उत्साह दिसत नाही. निवडणुकीपूर्वी कोणतीही लाट नव्हती. त्यामुळे हा निकाल अनपेक्षित वाटतो. यानंतर मतदारांकडे जाण्यापूर्वी विचार करावा लागेल,'' असेही पटेल म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com