यवतमाळ जिल्ह्याच्या ‘सहकारा’त निवडणुकीची लाट

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर यवतमाळजिल्ह्यातील तब्बल १७८ ग्राम विविध व आदिवासी कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे.
Election wave in 'Sahakara' of Yavatmal district
Election wave in 'Sahakara' of Yavatmal district

यवतमाळ : कोरोना उद्रेकात सहकार क्षेत्रातील निवडणुकांना ब्रेक लागला होता. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल १७८ ग्राम विविध व आदिवासी कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. सहकार प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या २० मार्चपासून जिल्हाभरात मतदान होणार आहे.  महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ७५२ कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. कोरोनाच्या उद्रेकामुळे मुदत संपलेल्या सोसायट्यांवर प्रशासक नेमण्यात आले. जवळपास वर्षभरापासून अनेक सोसायट्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती होता. सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या नसल्याने बाजार समित्यांच्या निवडणुकाही थांबल्या आहेत. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर प्राधिकरणाने सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. सोसायटी, संस्थांच्या प्रारूप मतदारयाद्या प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मतदारयाद्या प्रकाशित करून आक्षेप हरकती मागितल्या आहेत. सध्या यावर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी १७८ सोसायट्यांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असून, प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. परिणामी, सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले असून, सहकारात निवडणुकीच्या हालचालींनाही वेग आला आहे. 

संप स्थगित केल्याने आली गती  तिसऱ्या टप्प्यातील सहकारी संस्थांच्या मतदारयाद्या डिसेंबर २०२१मध्ये मागविण्यात आल्या होत्या. गटसचिवांच्या संपामुळे निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. गटसचिवांनी संप मागे घेतल्यानंतर कामाला वेग आला. सध्या १७८ सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रत्येक सोसायटीचा वेगळा कार्यक्रम आहे. येत्या २० मार्चपासून शनिवार व रविवार निवडणूक असलेल्या सोसायट्यांसाठी मतदान होणार आहे. सध्या १७८ सोसायट्यांची निवडणूक होणार आहे. पुढील निवडणुकांच्या तारखाही लवकरच प्रसिद्ध होतील.  - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com