Agriculture news in Marathi Elections to the Zilla Parishad chairmen on January 24 | Agrowon

पुणे जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या २४ ला निवडी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी झाल्या असून, विषय समिती सभापतींच्या निवडी अजूनही झालेल्या नाहीत. २४ जानेवारीला या विषय समिती सभापतींच्या निवडी होणार असल्याचा अधिकृत अजेंडा मंगळवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आला आहे. तोपर्यंत सध्या कार्यरत असलेले सभापतीच विभागाचा कारभार पाहणार आहेत.

पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी झाल्या असून, विषय समिती सभापतींच्या निवडी अजूनही झालेल्या नाहीत. २४ जानेवारीला या विषय समिती सभापतींच्या निवडी होणार असल्याचा अधिकृत अजेंडा मंगळवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आला आहे. तोपर्यंत सध्या कार्यरत असलेले सभापतीच विभागाचा कारभार पाहणार आहेत.

सभापतींची मुदत २० फेब्रुवारीपर्यंत आहे, त्यामुळे सर्व अधिकार सभापतींकडेच राहणार असल्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी नुकत्याच ११ जानेवारी रोजी पार पडल्या आहेत. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतिपदांकडे लक्ष लागून राहिले होते. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खेड, तर उपाध्यक्षपद भोर तालुक्याला गेल्यामुळे हे दोन तालुके वगळता अन्य ११ तालुक्यांतून चार सभापती निवड करणे पक्षापुढे आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाराजी दबावतंत्र आणि राजीनामानाट्य यामुळे दोन्ही पदांची नावे जाहीर करताना पक्षाला चांगलीच कसरत करावी लागली आहे. 

त्याप्रमाणे आता सभापतिपदाची नावे जाहीर करतानाही नाराजी पाहून पक्षाला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यातच या निवडीमध्ये महाविकास आघाडी व्हावी, अशी मागणी काँग्रेस व शिवसेनेकडून होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १३, तर काँग्रेसचे ७ सदस्य आहेत, त्यामुळे सभापतीपैकी एक पद महाविकास आघाडीला द्यायचे असल्यास शिवसेनेच्याच गळ्यात सभापतिपदाची माळ पडू शकते. 

महिला व बालकल्याण सभापती म्हणून महिला सदस्याला संधी दिली जाणार आहे, त्यामुळे पुरुष गटातून सभापतीची संधी मिळण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण, आरोग्य व बांधकाम ही तीनच सभापतिपदे आहेत. यात मावळ, बारामती, हवेली, शिरूर, इंदापूर, मुळशी, जुन्नर यापैकी चार तालुक्यांतील इच्छुकांना संधी मिळेल. त्यामध्ये महिला व बाल कल्याणसाठी चुरशीची लढत आहे.


इतर बातम्या
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
नाशिकमध्ये 'शिवभोजन’ थाळी सुरूनाशिक  : ''शिवभोजन योजना'' ही राज्यातील...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
कोल्हापूरला ३९१ कोटी रुपयांवर कर्जमाफी...कोल्हापूर : ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...