कर्नाटकात पाणी नेणाऱ्या विद्युत मोटारी केल्या जप्त
कर्नाटकात पाणी नेणाऱ्या विद्युत मोटारी केल्या जप्त

कर्नाटकात पाणी नेणाऱ्या विद्युत मोटारी केल्या जप्त

सलगरे, जि. सांगली ः येथील म्हैसाळ योजनेचे पाणी बेकायदा कर्नाटकात नेणाऱ्या विहिरीवरील वीजपुरवठा तोडल्यानंतर तहसीलदारांनी पाणी उपसा करणाऱ्या कृषी पंप (विद्युत मोटारी) जप्त करण्यात केल्या. जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने उपसा बंदी लागू केली आहे. 

म्हैसाळ योजनेचे पाणी शेततळे, विहिरींमध्ये पाणी साठवून विद्युत मोटारीद्वारे कर्नाटकातील अरळीहट्टी आणि बमनाळ येथे नेऊन विक्री केले जात होते. त्यातही शेतकरी सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात पाणी घेऊन जात असल्याने सलगरे परिसरातील शेतकरी आक्रमक झाले. 

त्यांनी सलगरेतील सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील व सहकाऱ्यांनी आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कर्नाटकात पाइपलाइनद्वारे म्हैसाळचे पाणी नेऊन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करून पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली होती. 

त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करीत वीजपुरवठा तोडल्यानंतर, पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटरी जप्त करण्यात आल्या. कर्नाटकात बेकायदा नेण्यात येणारे पाणी कायमस्वरूपी बंद झाले नाही तर, सलगरे येथील शेतकरी कर्नाटकातील या शेतकऱ्यांच्या पाइपलाइन जेसीबी लावून उखडून टाकतील, असा इशारा विजय पाटील यांनी दिला आहे.

तहसीलदार शरद पाटील यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार गोविंद वाकडे, मालगावचे मंडलाधिकारी कबीर सूर्यवंशी, तलाठी तोडकर यांनी ही कारवाई केली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com