यंत्रमागासाठी वीजदर सवलतीची बिले लागू

साध्या यंत्रमागधारकांच्या वीजदर सवलतीसाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले. यामुळे साध्या यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. - विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना
यंत्रमागासाठी वीजदर सवलतीची बिले लागू
यंत्रमागासाठी वीजदर सवलतीची बिले लागू

इचलकरंजी, जि. कोल्हापूर  : साध्या यंत्रमागासाठी प्रतियुनिट १ रुपये वीजदर सवलतीची बिले प्रत्यक्षात लागू झाली आहेत. त्यामुळे साधे यंत्रमागधारक सुखावले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून वीजदर सवलीतीची केवळ चर्चा होत होती. आता मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या सवलतीमुळे मंदीच्या वातावरणात साध्या यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वस्त्रोद्योग धोरणातील तरतुदीनुसार साध्या यंत्रमागास प्रतियुनिट १ रुपये वीजदरात सवलत देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली होती. त्याच्या अंमलबजाणीकडे लक्ष लागले होते. सवलतीची घोषणा २१ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. या शासन निर्णयाच्या दिवसापासून सवलत जाहीर करण्यात आली होती. मात्र याचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर उद्योगाची नोंदणी करण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे वीजदर सवलत मिळणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. किंबहुना साध्या यंत्रमागधारकांत अस्वस्थता पसरली होती. 

दरम्यान, जानेवारीची वीजबिले आज २७ एचपी खालील साध्या यंत्रमागधारकांच्या हातात पडली आहेत. त्यामध्ये शासनाने जाहीर केलेली एक रुपये अतिरिक्त वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे साधे यंत्रमागधारक सुखावले आहेत. तसेच वीजदर सवलतीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. वीजदर सवलतीवरून अनेक वेळा टीकाटिप्पणी झाली होती. मात्र अखेर वीजदर सवलतीचा लाभ मिळाल्यामुळे साध्या यंत्रमागधारकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

कोट्यवधी रुपये वाचणार शहरात सुमारे साडेपाच हजार साधे यंत्रमाग वीजग्राहक आहेत. वीजदर सवलतीमुळे त्यांचे महिन्याला कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. मंदीच्या काळातून मार्गक्रमण करणाऱ्या या उद्योगाला हा मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात सुमारे ८० हजार साधे यंत्रमाग वीजग्राहक आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com