जनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होईल, अशा औषधी
ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्याची वीजबिल थकबाकी ४४ कोटींनी वाढली
नगर ः खरीप हंगामात तयार झालेल्या तुरीला बाजारात भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने तुरीची हमी दराने खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. मात्र, अद्याप एकही खरेदी केंद्र चालु न झाल्याने शेतकऱ्यांना कमी दराने तूर विकावी लागत आहे.
नगर ः खरीप हंगामात तयार झालेल्या तुरीला बाजारात भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने तुरीची हमी दराने खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. मात्र, अद्याप एकही खरेदी केंद्र चालु न झाल्याने शेतकऱ्यांना कमी दराने तूर विकावी लागत आहे. त्यामुळे तूर हमीभाव खरेदी केंद्र तातडीने सुरू करावीत, अशी मागणी भारतीय जनसंसदेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने नाफेडमार्फत राज्यभरात खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी कंपन्या या माध्यमातून तूर, हरभरा, सोयाबीन, मका आदींची हमीभावाने खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो. हमीभाव खरेदीचा लाभ अनेक शेतकरी घेतात. सरकारने यावर्षी तुरीची हमीभावाने खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
शेतकरी कंपन्यांनी आॕफलाइन नोंदणी सुरू केलेली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ यांनी २८ डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. जिल्ह्यात शेतकरी कंपन्यांना अद्यापही ऑनलाइन नोंदणीचे आदेश न आल्याने आणि बाजार समिती, खरेदी विक्री संघ यांची प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. कारण प्रारंभी ५ हजाराचे आसपास असणारे तुरीचे भाव ५५०० पर्यंत गेले आहेत.
अनेक शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्याने नाइलाजाने बाजारात कमी भावाने तुरी विकाव्या लागत आहेत. त्यात प्रतिक्विंटल ५०० रुपये तोटा सहन करावा लागतो. म्हणून सरकारने तातडीने हमीभाव केंद्रावर तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, अशोक सब्बन, ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, अनिल टाक, अशोक ढगे, बबलू खोसला आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केली आहे.
- 1 of 1055
- ››