वीज बंद असलेल्या काळातील बिले रद्द करावी

The electricity bills should be canceled
The electricity bills should be canceled

कोल्हापूर : पावसाळ्यात पाच महिने वीज बंद असतानाही महावितरणने शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपयांची वीज बिले देऊन महाघोटाळा केला आहे. वीज बंद असलेल्या काळातील बिले तत्काळ रद्द करावित. याशिवाय, वीज जोडण्या, वीज वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मर बदलाचे काम पूर्ण १० जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत, अन्यथा ऊर्जामंत्र्यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही. तसेच शासनाला याची किंमत मोजावी लागले, असा इशारा बुधवारी (ता. २५) झालेल्या इरिगेशन फेडरेशनच्या मेळाव्यात विविध नेत्यांनी दिला. 

छत्रपती शाहू स्मारक भवन येथे पूरग्रस्त शेतकरी व शेतकऱ्यांचा मेळावा झाला.ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, ‘‘पुरात वीज वाहिन्या तुटल्या आहेत. ट्रॉन्स्फॉर्मर खराब झाले आहे. याचे काम अद्याप झालेले नाही. पावसाळ्यात किमान पाच महिने विद्युत पंपाची वीज बंद होती. तरीही, महावितरणने वापर नसताना कृषी पंपाची वीज बिले दिली आहेत. शासनाने या प्रश्‍नासाठी शेतकऱ्यांना मदत करावी. शासनाने यामध्ये मार्ग काढण्यासाठी पुढे आले पाहिजे. शासन किंवा महावितरण सांगत आहे ते मान्य करायला तयार नाही, तर आम्ही जे सुचवणार तेच शासन आणि महावितरणला ऐकावे लागले. राज्यात शेतकऱ्यांचाच कायदा चालणार हे विसरू नका. चुकीची आणि मनमानी वीज बिले देऊन पूराने उद्‌ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लुटण्याचा उद्योग महावितरणने करू नये. ऊर्जामंत्र्यांनीही हे लक्षात ठेवावे. शेतकऱ्यांकडून चुकीचे बिले आकारू नये. वीज वापरली आणि बिले देणार नाही, असे आमचे मत नाही. जी वीज वापरली नाही. त्याचे पैसे आम्ही देणार नाही. महावितरणची दांडगाई चालू देणार नाही. राज्य सरकार, महावितरण आणि राज्याचे सर्व मंत्र्यांनी १० जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या हा कळीचा प्रश्‍न सोडवला पाहिजे.

यावेळी प्रताप होगाडे म्हणाले, ‘‘महापुरामध्ये महावितरणचे सर्व फिडर, वीज ट्रान्स्फॉर्मर, वीज पंप बंद पडले होते. जिल्ह्यात आजअखेर वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. हीच परिस्थिती सांगली, सातारा, गडचिरोलीमध्ये आहे. ऑगस्टपासून ते जानेवारीपर्यंत गेले सहा महिने महावितरणने शेतकऱ्यांना वीजच दिलेली नाही. पण, वीज पंपाची बिले मात्र दिली आहेत. उच्च दाबाच्या सिंचन यांचे शून्य रीडिंग दाखले आहे. त्यांना कायमचा दर लावून बिले आकारली आहेत. लघुदाबाच्या वीजपंपधारक शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. ज्याला मीटर आहे, त्याचे रिडिंग अस्तित्वात नाही, तरीही सरासरी मीटर आकारणी करून नेहमीप्रमाणे वीजबिले दिली आहेत. ज्यांच्याकडे मीटर नाहीत, त्यांना तर २३०० ते ३५०० रुपये वीजबील पाठवले आहे. महावितरणाचा गजब कारभार आहे. वीजबील आकारणीच बेकायदेशीर आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांसह इतरांसमोर हा मुद्दा आणला आहे. वीज दिली तरच मागता येते; पण वीजच दिलेली नाही. तरीही तुम्ही बिले कसली देता, असा सवाल करत सहा महिन्यांची वीज बिले रद्द करावीत, अशी मागणीही श्री. होगाडे यांनी केली. 

यावेळी विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. के. पाटील, मारुती पाटील उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com