agriculture news in Marathi electricity of farmers will not cut Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही ः उपमुख्यमंत्री पवार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 मार्च 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे वीजजोडणी तोडली जाणार नाही, अशी घोषणा सभागृहात केली.

मुंबई ः हवे तर सरकारने चार-पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे; पण शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करावीत, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (ता. २) केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे वीजजोडणी तोडली जाणार नाही, अशी घोषणा सभागृहात केली. 

दरेकर यांनी या विषयाला विधान परिषदेत वाचा फोडली. जशी कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्याप्रमाणे राज्यातील शेतकरी, गरीब, सर्वसामान्य यांनाही वीजदेयकाचे पैसे कसे भरावेत, ही विवंचना आहे. त्यामुळे सरकारने पाहिजे तर चार-पाच हजार कोटी रुपये कर्ज काढावे; पण शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करावीत, अशी मागणी दरेकर यांनी सरकारकडे केली. त्यानंतर पवार यांनी निर्णय जाहीर केला. 

विधान परिषदेत प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलताना सरकारला धारेवर धरले. आपण सोलापूर, नांदेडच्या दौऱ्यावर असताना सर्वांना भेटल्यावर सरकारचा तुघलकी कारभार समोर आला, असे त्यांनी सांगितले. काही नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आलेली लाखो रुपयांची देयकेही दरेकरांनी सभागृहात दाखवली. विकासकांना सहा ते सात हजार कोटी रुपयांचा प्रीमियम माफ करणारे सरकार, दारू दुकानदारांची फी माफ करणारे सरकार महसूल मिळत नाही, हे कारण पुढे करून वीजदेयक माफी देत नाही. त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी चार-पाच हजार कोटी लागणार असतील, तर सरकार हा धाडसी निर्णय का घेत नाही, असा जाबही त्यांनी सरकारला विचारला. 

ऊर्जामंत्र्यांनी ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देतो, कोरोनामध्ये वीजदेयके कमी करतो म्हणून सांगितले. ते तर केले नाहीच, पण अवाजवी देयके दिल्यानंतर कोणतीही नोटीस न देता वीज कापली जात आहे. सोलापूर, पंढरपूरच्या दौऱ्यात तर डीपी खाली उतरवून ठेवलेले दिसले. गावे अंधारात गेली. दोन लोक थकबाकीदार असतील, तर उरलेल्या लोकांचा काय गुन्हा? राज्याची क्षमता आहे. चार-पाच हजार कोटी रुपयांचे आणखी कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करा. ते शक्‍य नसेल तर देयके तपासल्याशिवाय दुरुस्त करून दिल्याशिवाय वीजजोडणी कापू नये. किमान एक महिना तरी वीज कापू नये, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय ऊर्जा खात्याचा आहे. त्यावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक व शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडली जाणार नाही, अशी ग्वाही सभागृहाला दिली. 


इतर अॅग्रो विशेष
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारांनी...पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य...
सोयाबीन बियाणे वाहतुकीसाठी अट पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक...
काळ्या गव्हाच्या लागवडीची...नाशिक : काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
विदर्भात आज पावसाची शक्यता पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक...
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी...पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना...
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर...पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार...