agriculture news in marathi electricity issue in Deur, Kakani, Dhule district | Agrowon

देऊर, ककाणीत ‘सिंगल फेज’अभावी शेतकरी अंधारात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 मार्च 2020

देऊर, जि. धुळे : देऊर (ता. धुळे) व ककाणी (ता. साक्री) संलग्न असलेल्या शेती शिवारात रात्री घरासाठी देण्यात येणारा सिंगल फेज वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून बंद केला आहे. यामुळे शेतात वास्तव्यास असणाऱ्या शंभरावर शेतकरी व जागल्यांची कुटुंबे अंधारात आहे. शिवारात बिबट्या, रानडुक्कर, तरस आदी वन्यप्राण्यांचा वावर असून, पूर्वीप्रमाणे सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

देऊर, जि. धुळे : देऊर (ता. धुळे) व ककाणी (ता. साक्री) संलग्न असलेल्या शेती शिवारात रात्री घरासाठी देण्यात येणारा सिंगल फेज वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून बंद केला आहे. यामुळे शेतात वास्तव्यास असणाऱ्या शंभरावर शेतकरी व जागल्यांची कुटुंबे अंधारात आहे. शिवारात बिबट्या, रानडुक्कर, तरस आदी वन्यप्राण्यांचा वावर असून, पूर्वीप्रमाणे सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

येथील शिवारातील शेतकऱ्यांची शेती धुळे व साक्री तालुक्‍यातील सीमारेषेवर आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. ‘नको ती शेती’ अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सिंगल फेज वीजपुरवठ्याचे अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. आत्तापर्यंत सिंगल फेज विजेचे बिल येथील शेतकऱ्यांनी भरणा केला. कृषिपंपासाठी रात्री जेवढी वीज आली, तेवढीच वीज रात्री पाहायला मिळते अन्यथा सर्वत्र अंधारच असतो. आवश्‍यक संपर्क असणारा मोबाईल चार्जिंग होत नाही. अंधाराचा फायदा घेत बिबट्या थेट जनावरांना हल्ला करीत आहे. वीज कंपनीचे अधिकारी सांगतात, या शिवारातील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठी विशेष डिझाईन ट्रान्सफॉर्मर (एसडीटी) हवा. यापूर्वी या सिंगल फेजसाठी नेर वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात होता. मात्र ओव्हरलोडमुळे अतिरिक्त भार म्हसदी, चिंचखेडे येथे जोडण्यात आला आहे. या उपकेंद्राअंतर्गत या शिवारासाठी विशेष ट्रान्सफॉर्मर (एसडीटी) उपलब्ध नाही. त्या कारणास्तव हा वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

प्रतिक्रिया..
शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. सिंगल फेज वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा फायदा घेत वन्यप्राणी पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. शेती करणे अवघड झाले आहे. समस्या दूर व्हावी हीच अपेक्षा आहे. 
- बारकू शंकर बेडसे : शेतकरी, देऊर (जि. धुळे)

वीज कंपनीला निवेदन 
कुडाशी (ता. साक्री) येथे कायमस्वरूपी पूर्णवेळ सिंगल फेज वीजपुरवठा मिळावा या संदर्भात, वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता पी. ए. घोलप यांना शिवसेनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे निवेदन देण्यात आले. पश्‍चिम पट्ट्यात,  चरणमाळ, उंबरफाटा, नांदर्की, बसरावळ या सदर गावांना होणारा वीज पुरवठा पुरेसा स्वरूपाचा नसून रात्रीच्या वेळी ही गावे अंधारमय वातावरणात असतात. त्यामुळे या गावांना पूर्णवेळ स्वरूपाची वीजपुरवठा करून गावे प्रकाशमय करावी. पूर्णवेळ स्वरूपाचा विद्युत पुरवठा केल्यामुळे गावातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल तसेच रात्री -अपरात्री जनावरांपासून संरक्षण होण्यास मदत होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...