अमरावतीत शेती पंपाला रात्रीऐवजी दिवसा मिळणार वीज

शेती पंपाला रात्रीऐवजी दिवसा मिळणार वीज
शेती पंपाला रात्रीऐवजी दिवसा मिळणार वीज

अमरावती ः तुटवड्याच्या नावाखाली दिवसा वीजपुरवठा खंडित करून रात्री कृषिपंपांना वीज देण्याचा मुद्दा जिल्हा परिषद जलसंधारण समितीच्या सभेत चांगलाच तापला. रात्रीच्यावेळी पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांना सर्पदंशामुळे विषबाधा होत असल्याची प्रकरणे समोर येत असल्याने या मुद्यावर सदस्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी हा गंभीर तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्‍न सभेत मांडला. रात्रीऐवजी दिवसा सलग आठ तास कृषिपंपांना वीजपुरवठा व्हावा, असा ठराव या वेळी मांडत तो सर्वानुमते पारित करण्यात आला. सभापती बळवंत वानखडे, सदस्य देवेंद्र भुयार यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

या वेळी वीज कंपनीच्या धोरणावर टीका करण्यात आली. अनेकदा कंत्राटदार तसेच अभियंत्याची मिलीभगत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे, असा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी मांडला.

हयगय करणाऱ्यांचे थेट निलंबन सध्या दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून भविष्यात त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीटंचाई निर्मूलनाची कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जो अभियंता किंवा अधिकारी यामध्ये हयगय करताना आढळून येईल, त्याच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com