पुणे विभागात अडीच लाखांवर ग्राहकांचा वीजपुरवठा अद्यापही खंडित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पुणे विभागात झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी पूरस्थिती अजूनही कायम असून, सुमारे २६ उपकेंद्रांतर्गत ८५५५ रोहित्रे बाधित झाली आहेत. यामुळे विभागातील दोन लाख ६५ हजार ६३१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना लागत आहे. 

विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या गावांना जवळपास २६ उपकेंद्रांवरून वीजपुरवठा केला जातो. त्यासाठी बिगर शेतीकरिता १७१, तर शेतीकरिता २५९ वीजवाहिन्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. या वाहिन्यांवर सुमारे ८५५५ रोहित्रे जोडलेली आहेत. मात्र, जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रोहित्रे बाधित झाली असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे. विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २ हजार ७४० वीज रोहित्रे अजूनही बाधित आहेत. त्यामुळे एक लाख १५ हजार २८१ वीजग्राहकांचा वीजपुरवठा अजूनही बंद आहे. सांगली जिल्ह्यातही २२९१ रोहित्रे बाधित झाली आहेत. त्यामुळे एक लाख १० हजार ५६८ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. साताऱ्यातही ६९५ वीज रोहित्रे बाधित झाली आहेत. त्यामुळे नऊ हजार ८३ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. 

विभागात पूरग्रस्त भागात आत्तापर्यंत एकूण नऊ उपकेंद्रे सुरू करण्यात आले आहेत. या उपकेंद्रांवरून कृषी आणि बिगर कृषी मिळून सुमारे ४२८२ रोहित्रांमार्फत सुमारे दोन लाख ७६ हजार ४६३ नागरिकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ५६२ रोहित्रे सुरू झाली आहेत. येथील एक लाख ३४ हजार ६९५ नागरिकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात १८६० रोहित्रे सुरू झाली असून, ६८ हजार ९४१ नागरिकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सागंलीमध्ये ६०० रोहित्रांमार्फत ९१ हजार २१७, साताऱ्यात ६९० रोहित्रांमार्फत २२ हजार ९२२, तर सोलापूरमध्ये ५६७ रोहित्रांमार्फत दहा हजार ६८८ नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com