Agriculture News in Marathi Electricity supply to villages Will not break | Page 4 ||| Agrowon

गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही 

बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, या मागणीसाठी ‘महावितरण’च्या येथील विभागीय कार्यालयासमोर माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्यासह विविध तालुक्यांतील सरपंचांनी उपोषण केले.

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, या मागणीसाठी ‘महावितरण’च्या येथील विभागीय कार्यालयासमोर माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्यासह विविध तालुक्यांतील सरपंचांनी उपोषण केले. दरम्यान, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित करणार नाही, असे लेखी पत्र दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. 

दरम्यान, उपोषणाला जिल्हा परिषद सदस्य, सर्व तालुक्यांतील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी पाठिंबा दिला. माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे, अर्जुन आबिटकर, प्रवीण यादव, विजय भोजे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषणाची सांगता झाली. 

पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकीपोटी महावितरण ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करत आहे. या उलट महावितरणची कर बाकी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना करोडो रुपये देणे आहे. शासनाने या पूर्वी शासन निर्णयाद्वारे पथदिव्यांची ३१ मार्च २०१८पर्यंतची थकबाकी शासनाने भरावी. तसेच ३१ मार्च २०१८ नंतरच्या नवीन कनेक्शनची बाकी ग्रामपंचायतींनी भरावी, असा निर्णय दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर वीजपुरवठा खंडित करू नये. अन्यथा रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल, असा इशारा देत पन्हाळा, आजरा, कागल, शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील सरपंच महावितरणच्या कार्यालयासमोर जमा झाले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. सरपंच मगदूम यांनी भूमिका मांडली. 

या संदर्भात येत्या काही दिवसांत बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन अधिकाऱ्यांनातर्फे देण्यात आले. शिष्टमंडळात सरपंच अनिल पाटील, उपसरपंच अख्तर भालदार, वंदना मगदूम, नंदकुमार शिंगे, अभिजित घोरपडे, राजू पाटील, ए. वाय. मुल्ला, जिनगोंडा पाटील यांचा समावेश होता.  

टॅग्स

इतर बातम्या
शेततळ्यांना मिळणार ५२ कोटींचे अनुदानपुणे ः राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या...
राज्यात पावसाची उघडीप शक्य पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली...
 हवामानाच्या अचूक अंदाजासाठी ...औरंगाबाद : येथे सी बँड रडार डॉपलर बसविण्यास...
ब्राझीलमध्ये सोयाबीनची ८६ टक्के पेरणी...पुणे ः यंदा पेरणीला पोषक वातावरण असल्याने...
लाटलेला पैसा वसूल करण्याचे आदेशपुणे ः गट शेतीबाबत राज्य शासनाला दिशाभूल करणारी...
सांगली जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे...
जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास...सातारा, सांगली, जळगाव आणि धुळे-नंदूबार जिल्हा...
विकास सोसायट्यांच्या निवडणुकीनंतरच ...पुणे ः राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी...
ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादनाला...नाशिक : दळणवळणाला बूस्ट देण्यात हातभार लागणाऱ्या...
पीकविमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई...नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक...
खानदेशात कांदेबाग केळीखालील क्षेत्रात...जळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी लागवडीखालील...
सावदा, जि. जळगाव : केळी व्यापारात...सावदा, जि. जळगाव : कधी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका...
दिवाळीनंतरही शेतकऱ्यांची  शासकीय मदतीची...अकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात प्रत्येक...
धुळे जिल्ह्यात लसीसाठी मेंढ्यांसह...धुळे : मेंढ्यांसाठी एफएमडी लसीचा पुरेसा साठा...
पाणी पाळ्यांचे काटेकोर नियोजन हवे ः...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील सिंचनासाठी आवश्यक...
मराठवाड्यात सतरा लाख ४४ हजार क्‍विंटल...औरंगाबाद : जवळपास महिनाभराच्या विलंबाने सुरू...
‘रिलायन्स’च्या राज्य समन्वयकांना अटक...परभणी ः ‘‘येथील नवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
बुलडाणा : उन्हाळी सोयाबीनचे होणार...बुलडाणा : यंदा सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात रब्बीची ८६ टक्के पेरणी...सांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामाची १ लाख ७४ हजार...
पुणे जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या...पुणे ः दिवाळीची आतषबाजी संपल्यानंतर जिल्ह्यातील...